Iranने Israel मधील सर्वात मोठ्या रुग्णालयावर केला हल्ला; मृत्यूचा तांडव तर हजारो लोक झालेत जखमी!
Israel Vs Iran War Update News : इराण विरुद्ध इस्रायल यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस तापतच चालले आहे. अशातच, इराणच्या वतीने इस्त्रायलमधील टॉपच्या रुग्णालयावर हल्ला करण्यात आला आहे. हा क्षेपणास्त्र हल्ला होता. या अपघातात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. तर शेकडो लोक गंभीर जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. तर मृत्यूचा तांडव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
10 लाख लोकांना सेवा देणाऱ्या रुग्णालयावर हल्ला!
मिळालेल्या माहितीनुसार, इराणने ज्या रुग्णालयावर हल्ला केला ते रुग्णालय सुमारे 10 लाख लोकांना सेवा देते आणि दक्षिण इस्रायलसाठी मुख्य आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जाते. इस्रायल संरक्षण दलाने (IDF) या हल्ल्याची पुष्टी केली आहे. तर रुग्णालय प्रशासनानेही नुकसान आणि जखमींची नोंद केली आहे. अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य केले जात आहे. रुग्णालयाने लोकांना यावेळी येथे येण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे.

आयडीएफने काय म्हटले?
आयडीएफने ट्विटरवर म्हटले आहे की, 'क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यान अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यापैकी एक दक्षिण इस्रायलमधील सर्वात मोठ्या रुग्णालयातही आदळला. एएफपीच्या वृत्तानुसार, रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की रुग्णालयाचे नुकसान झाले आहे आणि अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ते पुढे म्हणाले, 'आम्ही सध्या नुकसान आणि जखमींबद्दल माहिती गोळा करत आहोत. यावेळी, आम्ही जनतेला रुग्णालयात न येण्याचे आवाहन केलेले आहे. 'जरी अद्याप संपूर्ण माहिती उपलब्ध नाही, तरी अग्निशमन दलाने एपीला सांगितले की, वैद्यकीय इमारती आणि निवासी क्षेत्रे दोन्ही लक्ष्यित करण्यात आली होती, जरी जोखमींची पुष्टी झालेली नाही.
इस्रायलने योग्य उत्तर दिले
दरम्यान, इस्रायली हवाई हल्ल्यांनी इराणमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे, ज्यात अरक हेवी वॉटर रिअॅक्टरचा समावेश आहे. इराणी सरकारी टेलिव्हिजनने वृत्त दिले आहे की तेहरानच्या नैऋत्येस 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या अरक सुविधा हल्ल्यापूर्वी रिकामी करण्यात आली होती.
अधिकाऱ्यांनी असेही स्पष्ट केले आहे की "कोणताही किरणोत्सर्गाचा धोका नाही". इस्रायलने स्थानिक रहिवाशांना परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला असला तरी, लष्कराने हल्ल्यांबाबत अधिक माहिती शेअर केलेली नाही. वृत्तानुसार, या हल्ल्यांमध्ये इराणच्या इतर भागांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.
इराणने इस्त्रायलच्या चार शहरांवर 30 क्षेपणास्त्रे डागली
प्रत्युत्तरादाखल इराणने तेल अवीव, बेअरशेबा, रमत गान आणि होलोन या चार इस्रायली शहरांवर 30 क्षेपणास्त्रे डागली. इस्रायली मीडिया रिपोर्टनुसार, इस्रायली संरक्षण यंत्रणा 7 क्षेपणास्त्रे रोखण्यात अपयशी ठरली. यामध्ये 176 लोक जखमी झाले आहेत. 6 जणांची प्रकृती गंभीर आहे.
इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, इराण जाणूनबुजून इस्रायली नागरिक आणि रुग्णालयांना लक्ष्य करत आहे. इस्रायल या हल्ल्यांचा बदला घेईल.
सातव्या दिवसावर पोहोचले युद्ध
इराण आणि इस्रायलमधील युद्ध सातव्या दिवशी पोहोचले आहे. आतापर्यंत 24 इस्रायली मारले गेले आहेत. दरम्यान, वॉशिंग्टनस्थित एका मानवाधिकार गटाने असा दावा केला आहे की इराणमध्ये मृतांची संख्या आता 639 वर पोहोचली आहे आणि 1329 लोक जखमी झाले आहेत.












Click it and Unblock the Notifications