Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कसली युद्धबंदी! तेहरानवर जोरदार हल्ले करा! इराणच्या मिसाईल हल्ल्यानंतर इस्त्रायलचे निर्देश

Iran again missile attack on Israel Even after the ceasefire : इराण इस्त्रायल युद्धात आज पहाटे युद्धबंदीची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली, यानंतर इस्रायलने युद्धबंदी स्वीकारली आणि स्वागत केले होते पण यानंतरही अमेरिकिन राष्ट्राध्यक्षांचे आवाहन झुगारुन इराणने इस्त्रायलवर हल्ला केला आहे. इस्रायली सैन्याने मंगळवारी दुपारी ही माहिती दिली. दरम्यान तेहरानवर जोरदार हल्ले करा, असे थेट निर्देशच इराणच्या मिसाईल हल्ल्यानंतर इस्त्रायलकडून त्यांच्या लष्कराला देण्यात आले आहेत. यामुळे उत्तर इस्रायलमध्ये सायरन वाजत आहेत.

Iran again missile attack on Israel

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्ती फुसकी ठरल्याची चर्चा होत आहे. कारण या युद्धबंदीनंतर इराणने इस्त्रायलवर मिसाईल डागने हे आणखी मोठ्या संघर्षाचे द्योतक ठरू पाहत आहे. इराणने मिसाईल डागल्यानंतर आता संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनीही लष्कराला प्रत्युत्तर देण्यासाठी मोकळीक दिली आहे. काट्झ यांनी लष्कराला तेहरानवर जोरदार हल्ला करण्यास सांगितले आहे.

यापुर्वी इस्त्रायलने केली होती हल्ला थांबवण्याची घोषणा

सांगायेच झाल्यास आज २४ जून रोजी सकाळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हल्ला थांबवण्याची घोषणा केली होती. त्यांनी म्हटले होते की, इस्रायली सैन्याचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. हा निर्णय अशा वेळी आला जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले होते. यानंतर इस्त्रायलने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे धन्यवादही मानले होते.

काय केली होती डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा

आज पहाटे डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट केली होती, यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाच्या १२ व्या दिवशी युद्धबंदीची घोषणा केली आणि सांगितले की ती पुढील ६ तासांत लागू होईल. निर्धारित वेळ संपल्यानंतर त्यांनी आणखी एक पोस्ट पोस्ट केली आणि लिहिले - "आतापासून युद्धबंदी लागू होत आहे, कृपया ती मोडू नका." पण ती इराणकडून मोडली गेली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+