Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एलन मस्क बनले 13व्या मुलाचे बाप! इन्फ्लुएंसर ऍशलीचा दावा; म्हणाली- 5 महिन्यांपूर्वीच बाळाचा जन्म..

Elon Musk Children News : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, स्पेसएक्स आणि टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांना तब्बल 13 अपत्य असल्याचं समोर आलं आहे. रुढीवादी प्रभावशाली आणि लेखीका ऍशली सेंट क्लेअर यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. ती म्हणाली की, एलन मस्क यांच्या 13 व्या मुलाला मी जन्म दिला आहे. हा जन्म पाच महिन्यांपूर्वीच झाला होता. परंतु, मुलाच्या गोपनीयतेचे आणि सुरक्षितेचे रक्षण करण्यासाठी आम्ही यापूर्वी उघड केले नाही. या दाव्याने आता खळबळ उडाली आहे.

काय दावा केला क्लेअर यांनी?

कंझर्व्हेटिव्ह इन्फ्लुएंसर आणि लेखिका ऍशले सेंट क्लेअर यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये दावा केला आहे की तिने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्कच्या १३ व्या मुलाला पाच महिन्यांपूर्वी जन्म दिला आहे. "आमच्या मुलाची गोपनीयता आणि सुरक्षितता जपण्यासाठी मी यापूर्वी हे उघड केलेले नाही." तिने पोस्टला कॅप्शन दिले आहे, "अलेआ इयाक्टा एस्ट", ज्याचा लॅटिन अर्थ "द डाय इज कास्ट" आहे.

Elon Musk Children News

काही महिन्यांपूर्वीच झाला होता 12 अपत्यांचा खुलासा

विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच एलन मस्क हे 12 व्या मुलाचे वडील असल्याचा दावा न्यूरालिंक कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या शिवोन जिलिस या महिलेने केला होता. 2021 साली शिवोन जिलिसने इलॉन मस्कच्या जुळ्या मुलांना जन्म दिला होता. इलॉन मस्कने ही बातमी बरेच दिवस लपवली होती. त्याचा खुलासा त्यांनी गेल्यावर्षी जून महिन्यात केला होता.

ब्लूमबर्गच्या अहवालात एलन मस्कच्या या 12 व्या मुलाबद्दल उल्लेख करण्यात आलेला आहे. इलॉन मस्कला 12 मुलं असून त्यापैकी सहा जणांचा जन्म गेल्या पाच वर्षांमध्ये झाला आहे. त्यामधील तीन मुलं ही संगितकार ग्रिम्सपासून झाली आहेत तर तीन मुलांची आई ही शिवोन जिलिस असल्याचं ब्लूमबर्गने म्हटलेले होते.

काही माध्यमांच्या अहवालानुसार, 2020 मध्ये संगीतकार ग्रिम्स हिने इलॉन मस्कच्या एका मुलाला जन्म दिला होता. त्या मुलाबद्दल सर्व काही गुप्त ठेवण्यात आले होते, परंतु इलॉन मस्कने त्याच्या चरित्रात त्याच्याबद्दल लिहिले. 2021 मध्येच इलॉन मस्कला शिवॉनपासून जुळी मुले झाली.

कोणत्या महिलेपासून किती अपत्य झालेत?

इलॉन मस्कबद्दल माहिती देताना कॅनेडियन लेखक जस्टिन विल्सन याने म्हटलं होते की,,एलन मस्कला आधीच्या लग्नापासून 6 मुले आहेत. त्यांचा पहिला मुलगा, नेवाडा अलेक्झांडर 2002 मध्ये जन्माला आला होता. परंतु 10 आठवड्यांनंतर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याला झेवियर आणि डॅमियन असे जुळी मुलं झाली. यानंतर त्याला काई, सॅक्सन आणि डॅमियन अशी तीन मुले झाले. शिवोन जिलिसपासून झालेल्या जुळ्या मुलांची नावं अझर आणि स्ट्रायडर अशी नावं आहेत. इलॉन मस्कच्या 12 व्या मुलाचे नाव आणि लिंग काय आहे ते अद्याप समोर आलं नाही. तोच आता ऍशली सेंट क्लेअर यांनी तेराव्या मुलाबाबत दावा केला आहे. दरम्यान याबाबत एलन मस्क यांच्याकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+