Video : लंडनमध्ये भारतीय तरुणींचा 'हिंदूस्थान झिंदाबाद'चा नारा; तिरंग्यासाठी थेट पाकड्यांशी नडल्या
Indian girls vs Pakistani youths Video : नुकत्याच झालेल्या भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनी लंडनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
स्वातंत्र्यदिनानिमित्त भारताचा तिरंगा घेऊन रस्त्यावर आलेल्या काही भारतीय तरुणींना पाकिस्तानी तरुणांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही पाकिस्तानी तरुण त्यांच्या देशाचा झेंडा फडकवत आहेत, तर त्याच वेळी भारतीय तरुणी भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवत आहेत.
या घटनेदरम्यान पाकिस्तानी तरुणांनी भारतीय तरुणींच्या हातून तिरंगा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तरुणींनी हार मानली नाही आणि मोठ्या धैर्याने त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी पाकिस्तानी तरुणांना मागे रेटले आणि त्याच वेळी 'हिंदुस्तान झिंदाबाद' अशा जोरदार घोषणा दिल्या.
सोशल मीडियावर या तरुणींच्या धाडसाचे मोठे कौतुक होत आहे. अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, या तरुणींनी केवळ देशाचा मान राखला नाही, तर अशा परिस्थितीत कसे वागावे हे देखील दाखवून दिले आहे.
⚡ UK: Pakistani goons harass Indian Muslim girls on the streets of London during India's Independence Day celebrations pic.twitter.com/QDDxArDinQ
— OSINT Updates (@OsintUpdates) August 18, 2025
लंडनमध्ये वाढते भारत-पाकिस्तानमधील तणाव
लंडनच्या रस्त्यांवर भारत आणि पाकिस्तानी नागरिकांमध्ये होणाऱ्या अशा चकमकी काही अजिबात नवीन नाहीयेत. यापूर्वी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या वेळी आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर दरम्यान देखील अशाच प्रकारचे संघर्ष दिसून आले होते.
दोन्ही देशांचे नागरिक आपल्या-आपल्या सरकारचे समर्थन करण्यासाठी रस्त्यांवर निदर्शने करतात, ज्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होते. या ताज्या घटनेने पुन्हा एकदा परदेशातील भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांमधील वाढत्या संघर्षाकडे लक्ष वेधले आहे.












Click it and Unblock the Notifications