बेरूतमधील भारतीय दूतावासाकडून लेबनॉन-इस्रायल संघर्षादरम्यान गाईडलाइन्स जारी, दिला हा सल्ला
मध्यपूर्वेतील वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बेरूतमधील भारतीय दूतावासाने नागरिकांसाठी एक प्रवास ॲडव्हायझरी जारी केली आहे. लेबनॉनला जाण्यापूर्वी प्रवाशांना विशेष खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. याआधी 1 ऑगस्ट रोजी दूतावासाकडून एक ॲडव्हायझरी जारी करण्यात आली होती. ज्यामध्ये असे म्हटले होते की, अलीकडील घटनांमुळे येथील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. त्यामुळे लेबनॉनमध्ये अधिक सावधगिरी बाळगा.
बेरूतमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना लेबनॉनला जाणे टाळण्याचे आवाहन करून कडक इशारा दिला आहे. जे आधीच तिथे आहेत त्यांना तेथून जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान इस्रायल आणि लेबनॉनमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. इस्रायलच्या लष्करप्रमुखांनी बुधवारी आपल्या सैनिकांना हिजबुल्लाच्या संभाव्य हल्ल्यासाठी पूर्णपणे तयार राहण्यास सांगितले.

लेबनॉनमधील हिजबुल्लाह विरुद्ध संभाव्य जमिनीवर हल्ला करण्यासाठी इस्रायलच्या लष्करी तयारीमुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी या प्रदेशात व्यापक युद्धाच्या शक्यतेवर चिंता व्यक्त केली आहे. युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार या तणावामुळे अलिकडच्या दिवसांत 90,000 हून अधिक लेबनीज लोक विस्थापित होऊन गंभीर मानवतावादी परिणाम झाले आहेत.
Advisory dated 25.09.2024 pic.twitter.com/GFUVYaqgzG
— India in Lebanon (@IndiaInLebanon) September 25, 2024
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ठामपणे सांगितले आहे की, उत्तरेकडील रहिवाशांच्या सुरक्षेची खात्री होईपर्यंत इस्रायलच्या हिजबुल्लाविरुद्धच्या लष्करी कारवाया सुरूच राहतील, जे सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य दर्शविते. विशेष म्हणजे या संघर्षाचे विध्वंसक परिणाम झाले आहेत. लेबनॉनच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, इस्त्रायली हल्ल्यांमुळे 51 मृत्यू आणि 223 जखमी झाले आहेत.












Click it and Unblock the Notifications