लंडनमधील रस्त्यावर भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांनी एकसुरात गायले 'जय हो...' ,पहा व्हिडिओ
Independence Day 2024 :आज 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण भारत देश 78वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. प्रत्येक जण स्वातंत्र्याच्या आनंदोत्सवात डुबला आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयाला नवीन भारताची पहिल्या सकाळची आठवण करुन देतो जेव्हा जवळजवळ 200 वर्षांच्या सत्तेची सुत्रे एका भारतीयाच्या हातात आली होती. 14 आॅगस्टला ब्रिटिशशासित भारताच सांप्रदायिकतेच्या आधारावर विभाजन झाले अन् भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र देशांचा जन्म झाला.
आता युनायटेड किंगडममध्येही भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांना एकत्र करणारा एक म्युझिशियन @vish.music चा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. दोन दिवसांपूर्वी पोस्ट केलेला हा व्हिडिओ लंडनमधील रस्त्यावरील आहे, जिथे विश गिटारवर ए. आर रहेमान गाणे जय हो... गात आहे आणि शेकडो भारतीय आणि पाकिस्तानी लोक आपापल्या देशाचे झेंडे हातात घेऊन त्याच्या सुरात सूर मिळवत आहेत. याशिवाय तिथे काही युकेचे झेंडे घेऊन देखील लोक उभे असलेले दिसत आहे. गर्दीत ऊभे अनेक लोक हे दृश्य आपल्या मोबाईल्स, कॅमे-यांमध्ये कैद करताना दिसत आहेत.

विशने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, जेव्हा भारतीय आणि पाकिस्तानी लंडनमध्ये एकत्र जय हो... गातात. चला तर मग प्रेम आणि एकतेसाठी हा व्हिडिओ शेअर करा. वाईट काळात आपल्याला एकमेकांची गरज असते.
हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी पण त्यावर भावनिक काॅमेंट्स केल्या, एका युजरने म्हटले आहे की- युकेनेच तोडले आणि युकेनेच जोडले. तर दुस-या एका युजरने म्हटले आहे की-संगीत ही अशी गोष्ट आहे की, सीमा तोडून हृदय जोडते, तर आणखी एका म्हटले आहे की- लंडनमध्ये भारताच्या स्वांतत्र्याचा जल्लोष शोकांतिका आहे.
एकाने तर म्हटले आहे की- हे एेकून अंगावर काटा येतो. याशिवाय या पोस्टवर ब-याच जणांनी स्वातंत्र्यदिनांच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. युकेमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक राहतात तिथे नेहमीच भारतीय सण, उत्सवांचे सुंदर दृश्ये पहायला मिळतात जिथे भारतीय नेहमी एकत्र येतात.












Click it and Unblock the Notifications