डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का! अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा मास्टरस्ट्रोक, व्हाईट हाऊसची कबुली
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफचे (आयात शुल्क) अस्त्र आता त्यांच्यावरच उलटत असल्याचे दिसत आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याने आणि चीन-रशियासोबतची जवळीक वाढवल्याने व्हाईट हाऊसचे टेन्शन वाढले आहे. यामुळे, अमेरिकेने पहिल्यांदाच या घडामोडींवर आपली चिंता व्यक्त केली आहे.

अमेरिकेच्या टॅरिफची पार्श्वभूमी
गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी भारतावर २५% टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. त्यानंतर, भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याने त्यांनी आणखी २५% अतिरिक्त टॅरिफ लावला. त्यानुसार, २८ ऑगस्टपासून भारतावर एकूण ५०% टॅरिफ लागू होणार आहे. ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करू नये, अशी अट घातली होती, परंतु भारताने या धमक्यांना जुमानले नाही. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रे देखील रशियाकडून वस्तू खरेदी करतात, त्यामुळे भारताला लक्ष्य करणे चुकीचे आहे.
व्हाईट हाऊसची चिंता वाढली
भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारत, चीन आणि रशिया यांच्यातील संबंध अधिक दृढ झाले आहेत. चीनने अमेरिकेच्या या निर्णयावर टीका केली, तर रशियाने भारताला पाठिंबा दिला. या तिन्ही देशांची वाढती जवळीक अमेरिकेसाठी चिंतेचा विषय बनली आहे. व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार आणि ट्रम्प यांचे निकटवर्तीय पीटर नवारो यांनी एका मुलाखतीत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भारताला थेट धमकी दिली आहे की, जर भारताला अमेरिकेसोबत आर्थिक संबंध मजबूत ठेवायचे असतील, तर त्यांनी रशिया आणि चीनसोबत असे संबंध वाढवू नयेत.
भारताचा दबाव वाढला
अमेरिकेच्या या भूमिकेनंतर भारतानेही आपला दबाव वाढवायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर जाणार असल्यामुळे भारत आणि चीन अधिक जवळ येत असल्याचे संकेत मिळत आहेत. रशियाकडूनही भारताला सतत पाठिंबा मिळत असल्याने अमेरिकेची कोंडी झाली आहे. या परिस्थितीत, भारताच्या परराष्ट्र धोरणाचा हा एक मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.












Click it and Unblock the Notifications