भारत-पाक तणावात चीनने तोंड खुपसले; पाकला दिली 'ही' १०० क्षेपणास्त्रे, युद्धातही मदत करणार? वाचा
जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. पाकिस्तानला भारताची भिती वाटू लागली आहे. कोणत्याही क्षणी युद्ध सुरु होईल, अशी पावले भारताने उचलल्याने पाकिस्तानचे टेन्शन वाढले आहे. त्यानंतर आज पाकिस्तानने नवे डावपेच सुरु केले. आज पाकिस्तानचे पराराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी इस्लामाबादमध्ये चीनचे राजदूत जियांग झे यांची भेट घेतली. त्यापूर्वी पाकिस्तानला चीनकडून १०० हून अधिक PL-15 लाँग रेंज एअर-टू-एअर क्षेपणास्त्रे (VLRAAM) देण्यात आली.

पाकला चीनकडून मिळाली क्षेपणास्त्रे
पाकिस्तान हवाई दलाने PL-15 ही हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र (VLRAAM) चीनकडून घेतल्याचे वृत्त आहे. ही क्षेपणास्त्रे २०० किलोमिटरपर्यंत मारा करु शकतात, असे सांगितले जात आहे. ही क्षेपणास्त्रे पाकिस्तानने JF-17 थंडर ब्लॉक-3 सोबत एकत्रित केली आहेत. PL-10E WVRM HOBS सक्षम क्षेपणास्त्र पंखांच्या टोकांवर देखील बसू शकतात. त्यानंतर तणावाच्या काळात पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री आणि चिनी राजदूतांचीही भेट झाली आहे. क्षेपणास्त्र दिल्याबद्दल पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनचे आभार मानले आहेत.
चीनकडून मागितली मदत
पाकिस्तानी पत्रकारांच्या मते, या बैठकीत उदयोन्मुख प्रादेशिक परिस्थितींवर चर्चा करण्यात आली. जवळचा समन्वय राखण्यावर एकमत झाले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एक्स अकाउंटवरून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "चीनी राजदूत जियांग झेड यांनी आज उपपंतप्रधान/परराष्ट्रमंत्री सिनेटर मुहम्मद इशाक दार यांची भेट घेतली. पाकिस्तान आणि चीनमधील सर्वकालीन धोरणात्मक भागीदारीची पुष्टी करताना, दोन्ही बाजूंनी उदयोन्मुख प्रादेशिक परिस्थितीवर विचारांची देवाणघेवाण केली आणि जवळून संवाद आणि समन्वय राखण्यास सहमती दर्शविली." चीनने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असला तरी, युद्धादरम्यान ते पाकिस्तानला मदत करू शकते असे मानले जाते.
Ambassador of China, Jiang Zaidong called on Deputy Prime Minister/Foreign Minister, Senator Mohammad Ishaq Dar @MIshaqDar50 today.
— Ministry of Foreign Affairs - Pakistan (@ForeignOfficePk) April 26, 2025
Reaffirming the all-weather strategic partnership between Pakistan and China, the two sides exchanged views on the evolving regional situation and… pic.twitter.com/BVZZpWHRpp
चीन पाकच्या पाठीशी?
चीनने पाकिस्तानला दिलेली क्षेपणास्त्रांची कमाल मारा क्षमता २०० किलोमीटर असल्याचे सांगितले जाते. जे पूर्वीच्या पीएल-१२ पेक्षा खूपच जास्त आहे ज्याची रेंज जेएफ-१७ सोबत १०० किलोमीटर होती. भारताविरुद्धच्या लढाईत चीन पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. शस्त्रास्त्रे पुरवण्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची बाजू घेण्यापर्यंत, ते पाकिस्तानची बाजू देखील घेऊ शकते. कारण चीनकडे संयुक्त राष्ट्रांमध्ये व्हेटो पॉवर आहे. त्यामुळे, पाकिस्तानशी असलेली जवळीक भारतासाठी चिंता वाढवू शकते.












Click it and Unblock the Notifications