18,000 भारतीयांची होणार घर वापसी ? ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारत बेकायदेशीर स्थलांतरितांना परत आणणार

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होताच बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांच्या या आदेशानंतर भारत सरकारनेही तेथे राहणाऱ्या 18,000 भारतीयांना परत आणण्याची तयारी सुरू केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारत सरकारने ट्रम्प प्रशासनाच्या सहकार्याने यावर काम सुरू केले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना सहकार्य करण्यास केंद्र सरकार उत्सुक आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्ट्सनुसार अमेरिका आणि भारत सरकारने सुमारे 18,000 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची ओळख पटवली आहे. त्यांना लवकर भारतात परत आणण्यात येणार आहे.

President Donald Trump

फोटो सौजन्य- पीटीआय

दरम्यान बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची संख्या किती आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही संख्या आणखी जास्त असू शकते असे म्हटलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार इतर अनेक देशांप्रमाणे भारत देखील ट्रम्प प्रशासनाला खूश करून व्यापारातील धोके टाळू इच्छितोय. एवढेच नाही तर भारताला आशा आहे की, ट्रम्प प्रशासनासोबतचे संबंध यामध्ये खूप मदत करतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्रम्पशी वैयक्तिक संबंध असल्याने, विद्यार्थी व्हिसा आणि एच-1बी व्हिसा असलेल्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. बेकायदेशीर स्थलांतरांविरुद्ध कारवाई हे ट्रम्प यांच्या निवडणूकतील एक प्रमुख आश्वासन आहे.

सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी पद व गोपनियतेची शपथ घेतली. त्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी हे वचन पूर्ण करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. या निर्णयांमध्ये जन्मसिद्ध नागरिकत्व संपवणे आणि अमेरिका-मेक्सिको सीमेवर सैन्य तैनात करणे समाविष्ट आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्ट्सनुसार भारताला सहकार्याच्या बदल्यात खूप अपेक्षा आहेत.

ट्रम्प प्रशासन भारतीय नागरिकांना अमेरिकेत प्रवेश देण्यासाठी कायदेशीर इमिग्रेशन चॅनेल, जसे की विद्यार्थी व्हिसा आणि कुशल कामगारांसाठी H-1B कार्यक्रम जतन करेल अशी भारताची अपेक्षा आहे. अधिकृत आकडेवारीनुसार 2023 मध्ये देण्यात आलेल्या 3,86,000 एच-1बी व्हिसांपैकी जवळजवळ तीन-चतुर्थांश व्हिसाचे प्रमाण भारतीय नागरिकांना होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+