Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारताचा मास्टरस्ट्रोक! फ्रान्सकडून घेणार 63 हजार कोटींची 'ही' २६ विमाने; पाकला आला घाम, कारण...

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांनी युद्धाची तयारी केली आहे. पाकिस्तानला चीन व नंतर तुर्कीने हत्यारे व क्षेपणास्त्र पुरविली. आता भारतानेही एक पाऊल उचलत फ्रान्ससोबत 26 राफेल मरीन विमानांची डील करण्याचा निर्णय घेतला आहे. आज ही डील पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. या दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये हा करार होईल. त्यानुसार, भारत फ्रान्सकडून २२ सिंगल सीटर विमाने आणि ४ डबल सीटर विमाने खरेदी करणार आहे.

India-France deal

भारत-फ्रान्समध्ये करार

भारत आणि फ्रान्सच्या संसक्षण मंत्र्‍यांमध्ये आज एक करार होणार आहे. त्यानुसार भारत फ्रान्सकडून २६ विमाने घेणार आहे. ही विमाने अणुबॉम्ब डागण्याची क्षमता असलेली असतील. वृत्तानुसार फ्रान्ससोबतचा हा करार सुमारे ६३,००० कोटी रुपयांना होत आहे. शस्त्रास्त्र खरेदीच्या बाबतीत भारताचा फ्रान्ससोबतचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २३ एप्रिल रोजी झालेल्या सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत या विमानाच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली होती.

या विमानांचे काय करणार?

भारत आयएनएस विक्रांतवर राफेल सागरी विमान तैनात करणार आहे. विमान उत्पादक कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने भारताच्या गरजेनुसार या विमानांमध्ये अनेक बदल केले आहेत. यामध्ये जहाजविरोधी हल्ला, अण्वस्त्रे डागण्याची क्षमता आणि १० तासांपर्यंत उड्डाण रेकॉर्डिंग यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. याशिवाय, कंपनी भारताला शस्त्र प्रणाली, सुटे भाग आणि विमानांसाठी आवश्यक साधने देखील पुरवेल. वृत्तानुसार या विमानांची डिलिव्हरी २०२८-२९ मध्ये सुरू होईल आणि सर्व विमाने २०३१-३२ पर्यंत भारतात पोहोचतील.

यापूर्वी घेतली ३६ राफेल विमाने

राफेल मरीनपूर्वी भारताने फ्रान्सकडून यापूर्वीही हवाई विमाने खरेदी केली आहेत. त्यात हवाई दलासाठी ३६ राफेल जेट विमानांचा समावेश आहे. हा करार २०१६ मध्ये झाला होता. व विमाने २०२२ मध्ये भारतात पोहोचली होती. ही विमाने हवाई दलाच्या अंबाला आणि हशिनारा हवाई तळांवरून चालवली जातात. हा करार ५८,००० कोटी रुपयांना झाला. राफेल मरीन विमानाची वैशिष्ट्ये हवाई दलाच्या राफेल विमानांपेक्षा अधिक प्रगत आहेत.

कसे आहे राफेल-एम?

राफेल मरीन हे नौदलाच्या विमानवाहू जहाजात वापरले जाईल. ते ५०.१ फूट लांबीचे असून त्याचे वजन १५ हजार किलोपर्यंत आहे. त्याची इंधन क्षमता ११,२०२ किलो आहे. ज्यामुळे ते जास्त वेळ उडू शकते. हे एकल आणि दुहेरी आसनी विमान ५२ हजार फूट उंचीवर पोहोचू शकते. या विमानाचे फोल्डिंग पंख देखील खूप मजबूत आहेत. वेग ताशी २२०५ किमी आहे. हे विमान फक्त एका मिनिटात १८ हजार मीटर उंची गाठू शकते. ते पाकिस्तानच्या एफ-१६ आणि चीनच्या जे-२० पेक्षा चांगले आहे. ते उड्डाण केल्यानंतर ३७०० किमी अंतरापर्यंत हल्ला करण्यास सक्षम आहे. त्यात ३० मिमी ऑटो कॅनन गन आणि १४ हार्ड पॉइंट्स आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+