अचूक निशाणा आणि दुश्मनचा खेळ खल्लास !भारतीय स्निपर रायफल खरेदी करण्यासाठी लागली आहे स्पर्धा
338 Saber Sniper Rifle : गेल्या काही वर्षात भारताने अधिकाधिक विध्वंसक शस्त्रे बनवण्यास सुरुवात केली आहे. आता भारताने जगातील सर्वात धोकादायक स्निपर रायफल बनवली आहे, जी विकत घेण्यासाठी स्पर्धा लागली आहे. या स्नायपर रायफलला त्याच्या अचूक क्षमतेसाठी प्रचंड मागणी वाढली आहे.

भारतीय शास्त्र बनवणा-या कंपनीने एक धोकादायक स्निपर रायफल डिझाईन केली आहे. 338 लापूआ मॅगनम कॅलिबर स्निपर रायफल असं त्या रायफलचं नाव आहे. SSS डिफेन्सकडून ही रायफल खरेदी करण्यासाठी भारताच्या एका मित्र राष्ट्राने एक मोठा करार केला आहे.
भारत प्रथमच रायफल निर्यात करणार आहे
द प्रिंटच्या वृत्तानुसार, भारतीय संरक्षण आस्थापनाने म्हटलं आहे की, भारताने परदेशात स्नायपर रायफल्सची निर्यात करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही स्नायपर रायफल पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे. तिच्या बॅरलसह ती 100 टक्के भारतात तयार केली गेली आहे. विशेष म्हणजे, केवळ स्निपर रायफल्सच नाही तर SSS शस्त्रास्त्र कंपनीने भारताच्या काही मित्र देशांकडून सुमारे 50 मिलियन किमतीच्या दारूगोळा पुरवठ्यासाठी करार केला आहे.
भारतीय संरक्षण सूत्रांनी सांगितले की, भारतीय खाजगी संरक्षण कंपन्यांनी परदेशी ग्राहकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकार त्यांना अधिक वेगाने शस्त्रास्त्रांच्या निर्यातीस मान्यता देऊन मदत करत आहे. भारताचे वार्षिक संरक्षण उत्पादन 2023-24 या आर्थिक वर्षात सुमारे 1.27 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. मेक इन इंडियाने भारतीय संरक्षण निर्यातीला चालना दिली आहे. द प्रिंटने आपल्या अहवालात भारतीय संरक्षण सुत्रांच्या दिलेल्या अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की, "भारत आता तोफखानापासून क्षेपणास्त्र प्रणाली आणि लहान शस्त्रास्त्रांपर्यंत मोठ्या प्रमाणात शस्त्रसामग्री तयार आणि निर्यात करत आहे. भारत आतापर्यंत ही शस्त्रे विदेशातून खरेदी करत होता .पण आता भारत स्वतःच्या उत्पादनातून केवळ गरजा भागवत नाही, तर आता निर्यातही करत आहे.
सूत्रांनी सांगितले की SSS डिफेन्सने स्निपर रायफल्सची निर्यात आधीच पूर्ण केली आहे, जी 1,500 मीटर आणि त्यापुढील लक्ष भेदण्यासाठी अचूक आहेत. त्याचबरोबर इतर अनेक देशांनी या कंपनीशी स्नायपर रायफल्स खरेदी करण्यासाठी संपर्क साधला असून हे व्यवहार वेगाने सुरू आहेत.












Click it and Unblock the Notifications