डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच भाषणात झाले इरादे स्पष्ट; वाचा, भाषणातील १५ महत्त्वाचे मुद्दे
अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प युग सुरू झाले आहे. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. अमेरिकेची सत्ता दुसऱ्यांदा त्यांच्या हाती आली आहे. ट्रम्प यांनी शपथ घेण्यापूर्वी जेडी वन्स यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष म्हणून शपथ घेतली. आजच्या पहिल्याच भाषणात त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १५ मुद्दे आपण पाहूयात...

ट्रम्प यांच्या भाषणातील मुद्दे
१. अमेरिकेचे सोनेरी दिवस सुरू झाले आहेत. ट्रम्प राजवटीत अमेरिका फर्स्टवर लक्ष केंद्रित केले जाईल. समृद्ध अमेरिका निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आमचे सार्वभौमत्व अबाधित राहील. जो बायडेन यांनी न्यायव्यवस्थेचा गैरवापर केला.
२. बायडेन यांनी समाजाची जडणघडण तोडली. ते जागतिक घडामोडी हाताळू शकत नव्हते. बायडेन यांच्या राजवटीत गुन्हेगारांना आश्रय मिळाला. सीमांच्या सुरक्षेबाबत तो काहीही करू शकले नाहीत.
३. आज संपूर्ण व्यवस्था बदलणार आहे. अमेरिका आता घुसखोरी होऊ देणार नाही. जग आमचा वापर करू शकणार नाही. लोकांनी मला बदलासाठी निवडून दिले आहे. मला 8 वर्षांपासून आव्हान दिले जात होते. माझ्या हत्येचा प्रयत्न झाला. आता अमेरिकेत झपाट्याने बदल होणार आहेत.
४. 20 जानेवारी 2025 हा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन आहे. आज आपला स्वातंत्र्यदिन आहे. देवाने माझे रक्षण एका खास उद्देशाने केले आहे.
५. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात मोठी घोषणा केली आहे. त्यांनी मेक्सिको सीमेवर आणीबाणी जाहीर केली आहे. त्यांनी दक्षिण सीमेवर आणीबाणी जाहीर केली आहे.
६. अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांनी आपली वृत्ती दाखवून दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही घुसखोरांना अमेरिकेतून हाकलून देऊ.
७. मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याचे काम केले जाईल. संघटित गुन्हेगारीविरोधात कामाला आजपासून सुरुवात होणार आहे. महागाई कमी करण्यासाठी आम्ही काम करू.
८. ट्रम्प यांनी आपल्या अमेरिकेबाबतच्या धोरणांची ब्ल्यू प्रिंटही देश आणि जगासमोर मांडली आहे. ते म्हणाले की अमेरिका पुन्हा उत्पादन केंद्र बनेल. अमेरिकेतून तेल आणि वायूची निर्यात वाढेल.
९. ट्रम्प यांनी शपथ घेताच उघडपणे अमेरिकेची देशांतर्गत व बाहेरील धोरणे मांडली. अमेरिकेच्या न्याय विभागाचे क्रूर आणि अन्यायकारक शस्त्रीकरण संपेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
१०. इतर देशांवरील कर आणि शुल्क वाढवतील. आम्ही देशातील कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा रुळावर आणू. अमेरिकेतील लोकांना भाषण स्वातंत्र्य असेल. आम्ही अमेरिकेच्या शत्रूंचा पराभव करू. अमेरिकेतील ड्रग्ज तस्करांना दहशतवादी घोषित करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
११. ट्रम्प म्हणाले, मी देशांना एकत्र करण्याचा प्रयत्न करेन. शांतता प्रस्थापित करणे हे माझे प्राधान्य आहे. विरोधकांवर सूडबुद्धीची कारवाई होणार नाही. अमेरिकन सैनिकांचे अधिकार वाढवले जातील. मी युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करेन.
१२. अमेरिकेचे सैन्य दुसऱ्याच्या युद्धात जाणार नाही. जगाने मला शांतीचा दूत म्हणून ओळखावे अशी माझी इच्छा आहे. चीनला आव्हान देताना ते म्हणाले की, पनामा कालव्याच्या माध्यमातून चीनचे वर्चस्व संपवू. पनामा कालवा परत घेणार.
१३. ट्रम्प म्हणाले, मंगळावर अंतराळवीर पाठवणार. सैन्य आपल्या कार्यासाठी मोकळे असेल.
१४. ट्रम्प म्हणाले, अवकाशात अमेरिकेचा झेंडा फडकणार आहे.
१५. माझ्या शपथापूर्वी इस्रायली ओलीस सोडले. मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार. गल्फ ऑफ मेक्सिकोचे नाव बदलून गल्फ ऑफ अमेरिका करण्यात येणार आहे. अमेरिकेसाठी काहीही अशक्य नाही.












Click it and Unblock the Notifications