Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाकिस्तानी तरुंगात इम्रान खानवर लैंगिक अत्याचार? बातमीने उडाली खळबळ, ही बातमी खरी की खोटी? वाचा

भारत आणि पाकिस्तानमध्ये यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झालेली असतानाच, आता पाकिस्तान मीडियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याबद्दलचा एक धक्कादायक दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही सोशल मीडिया हँडल आणि वापरकर्त्यांनी असा दावा केला आहे की इम्रान खान यांचे तुरुंगात लैंगिक शोषण करण्यात आले आहेत.

Imran Khan raped

नेमका काय आहे प्रकार?

पाकिस्तानी न्यूज वेबसाईट डाॅन याने एक धक्कादायक बातमी दिली आहे. ती बातमी अनेक सोशल मिडिया हॅण्डेलवर व्हायरल करण्यात आली. या बातमीच्या दाव्यांमध्ये असे म्हटले आहे की, पाकिस्तानी लष्कराच्या एका मेजरने तुरुंगात इम्रान खानवर बलात्कार केला. या दाव्याच्या समर्थनार्थ काही वापरकर्त्यांनी वैद्यकीय अहवाल आणि डॉन न्यूज वेबसाइटवरील बातमीचाही उल्लेख केला आहे. तथापि, या सर्व दाव्यांना अद्याप कोणत्याही अधिकृत सूत्राने पुष्टी दिलेली नाही.

नेमका काय आहे दावा?

एका X (पूर्वीचे ट्विटर) हँडलने लिहिले की, "इम्रान खानवर पाकिस्तानी लष्कराच्या मेजरने बलात्कार केला आहे. पाकिस्तानी तुरुंगांमध्ये पुरुषांविरुद्ध लैंगिक हिंसाचार सामान्य आहे, जो एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला आणि आत्मसन्मानाला चिरडण्याचा प्रयत्न करतो." दुसऱ्याने लिहिले, हा प्रकार अत्यंत वाईट आहे.

इम्रान खानची तपासणी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मार्चमध्ये इम्रान खानच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त झाल्यानंतर, वैद्यकीय पथकाने त्यांना ठेवण्यात आलेल्या आदियाला तुरुंगात त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली. पाकिस्तानी न्यूज पोर्टल 'डॉन' ने वृत्त दिले आहे की डॉक्टरांच्या पथकाने खानची सुमारे 30 मिनिटे तपासणी केली. तथापि, तो वैद्यकीय अहवाल सार्वजनिक करण्यात आला नाही. इम्रान खान यांच्या पक्षाच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या एका नेत्याने आरोप केला आहे की इम्रान खान यांना त्यांच्या बहिणींना भेटू दिले जात नाही आणि त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनाही भेटू दिले जात नाही. यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता आणखी वाढत आहे.

बातम्या खऱ्या की खोट्या?

सध्या हे स्पष्ट आहे की सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही किंवा इम्रान खान किंवा त्यांच्या पक्षाकडून कोणतेही स्पष्ट विधान आलेले नाही. अशा परिस्थितीत या बातम्यांबाबत सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. ही बातमी खोटी असू शकते, असेही काहींचे म्हणणे आहे. मात्र सध्या भारत-पाकिस्तान यांच्या तणावात अशा प्रकराची बातमी आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+