'मिल्टन'ने केले होत्याचे नव्हते; अमेरिकेत वादळाचा कहर, पंधरा दिवसात दुसरे चक्रीवादळ

अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात गुरुवारी सकाळी 'मिल्टन' चक्रीवादळ धडकले. या चक्रीवादळाने सेंट पीटर्सबर्ग, प्लोरिडा येथे प्रचंड पाऊस झाला. गेल्या एक हजार वर्षात झाला नव्हता एवढा पाऊस या चक्रीवादाळामुळे झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. या राज्यात अवघ्या तीन तासांत 16 इंच पाऊस झाल्याचे समजते. या वादळामुळे प्रचंड नुकसान झाले असून झाडे, विजेचे खांब, वाहिन्या, घरे, इमारती अक्षरशः जमिनीवर कोसळल्या. साधारणः 20 लाख लोकांना या चक्रीवादळामुळे स्थलांतर करावे लागले. पहिल्याच दिवशी 10 जणांचा मृत्यू झाल्याचेही समजते.

वर्षातील तिसरे चक्रीवादळ

फ्लोरिडा राज्यात आलेले वर्षातील हे तिसरे चक्रीवादळ आहे. यापूर्वी 15 दिवसांपूर्वीच येथे चक्रीवादळाने तडाखा दिला होता. त्यावेळी आलेल्या 'हेलन' या वादळात दोनशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. हेलनने त्यावेळी अमेरिकेतील 12 राज्यात कहर केला होता. आता पंधरा दिवसांत पुन्हा मिल्टनने अमेरिकेचे जीवन विस्कळीत केले आहे. हे वादळ श्रेणी दोनमधले आहे, असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या वादळाचा धोका वाढला आहे. सर्वत्र पावसाचा जोर असून पाणी तुंबले आहे.

Hurricane Milton

ताशी 193 किलोमिटर वेगाचे वारे

या चक्रीवादळामुळे अनेक शहरात ताशी 193 किलोमिटर वेगाने वारे वाहत आहे. फ्लोरिडातील 20 लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. शिवाय 4300 लोकांना रेस्क्यू ऑपरेशन करुन सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या वादळात अनेक मोठमोठ्या इमारती पत्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याची माहिती आहे. सुमारे 10 लाख घरांतील वीज गायब असून ती कधीपर्यंत दुरुस्त होईल, हे सांगण्यात आलेले नाही. मिल्टन चक्रीवादळामुळे पहिल्याच दिवशी आठ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज बांधला जात आहे.

'मिल्टन' पाठोपाठ 'लेस्ली'चाही धोका

या राज्यात आत्तापर्यंत तीन चक्रीवादळे आले. त्याने कोट्यवधींचे नुकसान केले आता पुन्हा लेस्ली चक्रीवादळ येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अटलांटिका महासागरात लेस्ली हे वादळ तयार होत आहे. ते अमेरिकेत येणार नाही, असेही काहींचे म्हणणे आहे. मात्र पहिल्या वादळांची तीव्रता पाहता नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+