Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रशियातूनच तेल खरेदी करणारच! बिहारपेक्षा लहान 'या' इटुकल्या देशाने ट्रम्पचा इशारा झुगारला! जाणून घ्या

Hungary Defies Trump's Warning Confirms : व्हिसा धोरण, टॅरीफ धोरण असो की आणखी काही जागतिक पातळीवर दबाव आणण्याचा प्रयत्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत आहे. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरीफ पुराण चांगलेच गाजले. आधी २५ नंतर पुन्हा अतिरिक्त दंड २५ असा ५० टक्के टॅरीफ म्हणजेच आयातशुल्क भारतावर लादणाऱ्या ट्रम्प प्रशासनाला भारताने झुगारले.

Hungary Defies Trump s Warning Confirms

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनाला थाराही न देणाऱ्या भारत, चीनसह आता या पंक्तित आणखी एका देशाचा समावेश झाला आहे. हा देश युरोपातीलच आहे. विशेषतः भारतातील बिहार राज्यापेक्षाही लहान असलेल्या या देशाने डोनाल्ड ट्रम्प यांना चॅलेंज केले आहे. एकीकडे युरोपीय महासंघाला भारतावर टॅरीफ लादण्यासाठी आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते, पण या आवाहनाला युरोपीय महासंघाने टोलवले.

यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची पिछेहाट होत आहे. ते युरोपातील छोट्या देशांवर दबाव टाकत असून टॅरीफचा बोझाही लादत आहेत. रशियाला एकटे पाडण्याच्या रणनितीमध्ये ट्रम्प इतर देशांची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत, दबावनिती वापरत असतानाच त्यांनी नाटोमधील समाविष्ट देशांना रशियाकडून तेल खरेदी करु नये म्हणून दबाव टाकत आहेत.

हंगेरीने ट्रम्प यांच्या आवाहनाला झुगारले!

वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, हंगेरीसारख्या देशालाही रशियाकडून तेल खरेदी करु नये, म्हणून डोनाल्ट ट्रम्प दबाव टाकत आहेत. अशातच हंगेरीने आपल्या देशाची भूमिका स्पष्ट केली असून रशियाकडून तेल खरेदी थांबवणार नाही ती सुरुच ठेवणार असे स्पष्ट केले आहे. शिवाय हंगेरी आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी कोणताही समझोता करणार नाही असे म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांना चॅलेंज केले आहे.

आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

हंगेरीच्या या भुमिकेमुळे वैश्विक राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे कारण एक छोटा देश आता बलाढ्य आणि आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे आवाहन झुगारतो ही मोठी बाब असून आंतरराष्ट्रीय राजकारणातील दादा अमेरिका कशी नाही हे यातून दिसून येत आहे.

काय म्हणाले हंगेरीचे परराष्ट्रमंत्री?

हंगेरीचे परराष्ट्रमंत्री पिटर सिज्जारटो यांनी स्पष्ट केले की, हंगेरी आपल्या ऊर्जेची पुर्तता करण्यासाठी रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी सुरुच ठेवेल. रशियाशिवाय हंगेरीकडे दुसऱ्या ठिकाणाहून पुरवठा होईल अशी कोणतीही यंत्रणा नाही त्यामुळे रशियासोबत खरेदी करणे हे व्यवहार्य आणि आवश्यक आहे. ऊर्जा सुरक्षेशी तडजोड करुन राजकीय दबावात आम्ही फसणारे निर्णय घेणार नाही.

केवढा आहे हंगेरी देश?

हंगेरी हा देश भारतातील बिहार राज्याएवढा आहे, हंगेरीचे क्षेत्रफळ पाहता ते ९३,०३० किमी वर्ग एवढे आहे लोकसंख्येच्या तुलनेत हा देश जगात १०९ व्या क्रमांकावर आहे तर बिहारचे क्षेत्रफळ ९४,१६२ किमी वर्ग तसे पाहता बिहारपेक्षा हा देश लहान आहे ज्याने ट्रम्प यांना टोलवले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+