Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एका ठिणगीने घेतला 44 लोकांचा जीव! हाँगकाँगमध्ये भीषण अग्निकांड! 16 तास इमारतींना आग; 279 जण बेपत्ता

Hong kong tai po court fire 44 dead 279 missing What caused the fire : हाँगकाँगच्या ताई पो परिसरात असलेल्या 'वांग फुक कोर्ट' या निवासी संकुलात मंगळवारी सायंकाळी लागलेल्या आगीने संपूर्ण शहराला हादरवून सोडले आहे. १९४५ नंतर हाँगकाँगमध्ये घडलेली ही सर्वात मोठी आणि प्राणघातक दुर्घटना ठरली आहे. १६ तास उलटून गेल्यानंतरही आग विझवण्याचे कार्य सुरूच आहे, तर या भयानक दुर्घटनेत ४४ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून, सुमारे २७९ लोक अजूनही बेपत्ता आहेत.

Hong kong tai po court fire

आग कशामुळे लागली?

आठ उंच टॉवर्स असलेल्या या सोसायटीमध्ये सध्या दुरुस्तीचे काम सुरू होते. टॉवर्सच्या बाहेर बांबूच्या सांगाड्यांचे मोठे जाळे उभे करण्यात आले होते, ज्यावर हिरवी जाळी लावण्यात आली होती.

आग लागण्याचे नेमके कारण काय?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट किंवा एखादी ठिणगी पडल्यामुळे आग लागली.

बांबू आणि ज्वलनशील साहित्य: बांबूचे सांगाडे आणि त्यावर लावलेले प्लास्टिकचे साहित्य अत्यंत ज्वलनशील असल्याने अवघ्या १० मिनिटांत आगीने रौद्ररूप धारण केले.

तीव्र वाऱ्यामुळे फैलाव: वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ही आग क्षणाक्षणात सात टॉवर्सपर्यंत पसरली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली.

बचाव कार्यात अडथळे आणि 'लेव्हल-५' अलार्म

  • या आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की, सुरुवातीला लेव्हल-१ चा अलार्म देण्यात आला होता, पण सायंकाळपर्यंत ही आग सर्वोच्च गंभीर स्तरावर म्हणजेच 'लेव्हल-५ अलार्म' म्हणून घोषित करावी लागली.
  • आग विझवण्यासाठी ७६७ हून अधिक अग्निशमन कर्मचारी, १२८ गाड्या आणि ५७ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या.
  • उंच इमारती आणि कोसळणारे बांबूचे सांगाडे यामुळे अग्निशमन दलाला इमारतींमध्ये प्रवेश करणे अत्यंत कठीण झाले.
  • अति उष्णता, धूर आणि कोसळणाऱ्या वस्तू यामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे निर्माण झाले.

ताजे अपडेट्स: मृत्यू आणि बेपत्ता लोकांची संख्या

आतापर्यंत, या दुःखद अपघातात ४४ लोकांच्या मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. ज्यात एका अग्निशमन दलाच्या जवानाचाही समावेश आहे. तर सुमारे २७९ लोक अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये बहुतेक वृद्ध आणि लहान मुलांचा समावेश आहे. ४५ हून अधिक लोक गंभीररित्या भाजले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ज्यांचे घरे जळून खाक झाली आहेत, अशा बाधित लोकांना तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये हलवण्यात आले आहे.

३ जणांना अटक; निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

हाँगकाँग पोलिसांनी तातडीने कारवाई करत याप्रकरणी तीन लोकांना अटक केली आहे. यात ठेकेदार कंपनीचे दोन मालक आणि एक इंजिनिअरचा समावेश आहे. या तिघांवर 'निष्काळजीपणामुळे हत्या' करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'ही' केली निष्काळजी!

प्राथमिक तपासानुसार, दुरुस्तीच्या कामात आग प्रतिबंधक सामग्रीचा वापर केला नव्हता, तसेच सांगाड्यासाठी स्वस्त प्लास्टिकचा वापर केला होता. यामुळे आग वेगाने पसरण्यास मदत झाली. घटनेच्या सखोल चौकशीसाठी एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+