Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हमासचा नेता याह्या सिनवारचा खात्मा! हमास प्रमुखाच्या मृत्यूची इस्रायली PM नेतन्याहूंकडून स्पष्टोक्ती

Hamas chief Yahya Sinwar Death Israel verify : गाझा पट्टीतील हमासचा नेता याह्या सिनवार या भागात इस्त्रायली लष्करी कारवाईत मारला गेला असावा अशी शक्यता होती, यावर इस्रायलचे PM नेतन्याहूंकडून स्पष्टोक्ती मिळाली आहे. दरम्यान, हमास प्रमुखाच्या मृतदेहाचा कथित फोटो व्हायरल झाला होता.

महत्वाची माहिती ही की, इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गटांमधील वाढता तणाव आणि हिंसक घडामोडी घडल्या, त्यारदम्यानच ही घटना घडली अशी शक्यता आहे.

Hamas chief Yahya Sinwar Death

आयएफडीच्या कारवाईदरम्यान खात्मा?

प्राप्त माहितीनुसार, गाझामध्ये आयडीएफच्या कारवाईदरम्यान, तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. आयडीएफ आणि आयएसए या तीन दहशतवाद्यांपैकी एक याह्या सिनवार असण्याची शक्यता तपासत आहेत. या दहशतवाद्यांच्या ओळखीची खात्री होत नाही हे आयडीएफने X वर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेचज्या इमारतीत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला या भागात कार्यरत असलेल्या सैन्याने आवश्यक सावधगिरीने कार्य करणे सुरू ठेवले आहे," असे IDF निवेदनात म्हटले आहे.

याह्या सिनवारचा मृतदेह असल्याचा फोटो सोशल मीडियावर

या सर्व घडामोडीदरम्यान हमास नेता याह्या सिनवारचा मृतदेह असल्याचा दावा करणारा फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र तो त्याचाच आहे हे खात्रीलायक सांगता येत नाही. यासंदर्भात न्यूयॉर्क टाइम्सने इस्रायली अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सिनवारचा संशयित मृतदेह डीएनए पडताळणीसाठी इस्रायलला पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, इस्रायली वायुसेनेने गुरुवारी हमास आणि इस्लामिक जिहादच्या अतिरेक्यांनी वापरल्या जाणाऱ्या संमेलनाच्या स्थळाला लक्ष्य करून अचूक हवाई हल्ला केला. लष्कर तसेच इस्त्रायलची अंतर्गत सुरक्षा सेवा आणि दक्षिणी कमांड यासह विविध लष्करी शाखांकडून गोळा केलेल्या गुप्तचरांकडून स्ट्राइकसंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. लक्ष्यित स्थान कमांड आणि कंट्रोल सेंटर म्हणून ओळखले गेले होते, पूर्वी उत्तर गाझामधील "अबू हसन" स्कूल कॅम्पस म्हणून ओळखले जात होते, जे लष्करी हालचालीसाठी पुन्हा तयार केले गेले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+