हमास प्रमुखाच्या हत्येचे दोन महिन्यापूर्वीच केले होते 'असे' प्लॅनिंग
Ismail Haniyeh: हमास प्रमुख इस्माइल हानिया यांची 31 जुलै रोजी इराणमधील तेहरान येथे हत्या करण्यात आली होती. हमास प्रमुखाला मारण्याची ही योजना सुमारे 2 महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. असा अमेरिकन मीडिया हाऊस न्यूयॉर्क टाइम्सने दावा केला आहे.
समोर आलेल्या वृत्तानुसार, हमास प्रमुख इस्माइल हानिया हे बुधवारी, 31 जुलै रोजी राष्ट्रपतींच्या शपथविधीसाठी तेहरानला पोहोचले होते. दोन महिन्यांपूर्वी ते राहत असलेल्या गेस्ट हाऊसमध्ये बॉम्ब लपवून ठेवला होता.या गेस्ट हाऊसच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी इराणच्या आर्मी आयआरजीसीकडे होती. हे गेस्ट हाऊस नेशात नावाच्या कॉम्प्लेक्सचा भाग आहे. हानिया गेस्ट हाऊसमध्ये पोहोचल्याचे समजताच बाहेरून रिमोटद्वारे स्फोट घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.

या स्फोटात हमास प्रमुख इस्माईल हानिया यांच्यासह एका अंगरक्षकाचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी इमारतीच्या भिंतीचा काही भाग कोसळला. याशिवाय अनेक खिडक्यांच्या काचाही तुटल्या. इराण आणि हमास या दोन्ही देशांनी इस्रायलवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.मात्र, इस्रायलने आपला सहभाग जाहीरपणे मान्य केलेला नाही. पण, त्याने या ऑपरेशनबद्दल अमेरिका आणि इतर पाश्चात्य सरकारांना कळवले आहे. हमास प्रमुखाच्या हत्येमुळे हिंसाचार वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
सुरुवातीला इस्रायलने क्षेपणास्त्र हल्ला केला असावा,अशी शक्यता वर्तवली जात होती.मात्र, हमास प्रमुख इस्माईल हानिया यांची हत्या करण्यासाठी मारेकऱ्यांनी गेस्ट हाऊसमध्ये बॉम्ब ठेवल्याचे नंतर उघड झाले.अहवालानुसार, एक वैद्यकीय पथक कॉम्प्लेक्समध्ये आल्यानंतर त्यांनी तपासनी करुन हानियाला मृत घोषित केले. गाझामधील हमासचे डेप्युटी कमांडर खलील अल-हय्या यांनी हानियाचा मृतदेह पाहून इतर अधिकाऱ्यांना माहिती दिली.
तेहरानमधील गेस्ट हाऊस जिथे स्फोट झाला होता ते इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड्स अनेकदा माघार घेण्यासाठी आणि गुप्त बैठकांसाठी वापरतात गुरुवारी तेहरानमध्ये हमास प्रमुख हानिया यांना अंत्यसंस्कार करण्यापूर्वी अंतिम निरोप देण्यात आला. त्यात हजारो लोक सहभागी झाले होते. हानिया यांचे पार्थिव तेहरान विद्यापीठात अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर त्यांच्या पार्थिवाची तेहरानमधील फ्रीडम स्क्वेअरपर्यंत शेवटची मिरवणूक काढण्यात आली.
कोण होते इस्माईल हानिया
इस्माईल हानियाचा जन्म 1962 साली गाझापट्टीतील एका निर्वासित शिबीरामध्ये झाला. तो 2017 साली हमास संघटनेचा प्रमुख बनला. त्यानंतर त्यानं गाझापट्टी सोडली होती. हमास प्रमुख होण्यापूर्वी त्याला 2006 साली पॅलिस्टाईन प्राधिकरणाचा पंतप्रधान म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते. त्याला 2017 साली अमेरिकेनं जागतिक दहशतवादी जाहीर केलं होतं.
हमास प्रमुख झाल्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये गाझा पट्टी सोडली. हमासनं गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी त्याच्याच नेतृत्त्वाखाली इस्रायलवर क्षेपणास्त्र टाकली होती.मात्र हमास प्रमुखाच्या मृत्यूनंतर इराण आणि तुर्कियेसह अनेक देश संतप्त झाले आहेत. इराणने तर हानियाच्या मृत्यूचा बदला म्हणून थेट इस्रायलवर हल्ला करणार असल्याचे म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications