तेहरानमध्ये हमास प्रमुख इस्माईल हानियाची हत्या! इस्रायलने 'त्या' रक्तपाताचा घेतला बदला!

इस्रायलने 7 ऑक्टोबरच्या घटनेचा बदला घेत हमास प्रमुखाची हत्या केली आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये हमास प्रमुख इस्माइल हानिया मारला गेल्याचे वक्तव्य खुद्द हमासने केले आहे. तेहरानमधील हानियाचं घरचं इस्त्रायलनं उडवलं, ज्यात हानिया मारला गेला आहे.

7 ऑक्टोबरचा संपूर्ण बदला घेत इस्रायलने हमास प्रमुखाची हत्या केली आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये हमास प्रमुख इस्माईल हानिया यांची हत्या करण्यात आल्याचे खुद्द हमासने एक निवेदन जारी केले आहे.

Israel Hamas War Latest Update Marathi News

लपलेल्या ठिकाणी हल्ला

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने एका निवेदनात पुष्टी केली आहे की, हा हल्ला तेहरानमधील हानियाच्या लपण्याच्या ठिकाणावर करण्यात आला होता, ज्यामध्ये हमास प्रमुख तसेच एक अंगरक्षक ठार झाला होता.

काल शपथविधीत सहभागी आज हल्ल्यात ठार

हल्ल्यातील मृत्यूपूर्वी काल अर्थात मंगळवारी इस्माईल हानिया ईरानच्या नव्या राष्ट्रपतीच्या शपथविधी समारंभात सहभागी झाला होता. यादरम्यान हानियाने ईरानचे सर्वोच्च नेते अयातूल्ला अली खामेनेई यांची भेटही घेतली होती.

हानियाच्या मुलांना आधीच ठार केलं

अलीकडे (एप्रिल 2024), हानियाच्या तीन मुलांचीही इस्रायली सुरक्षा दलांनी हत्या केली होती. इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात हानियाच्या तीन मुलांचा मृत्यू झाला होता. इस्रायली आर्मी आयडीएफने सांगितले होते की, हानियाची तीन मुले आमिर, हाझेम आणि मोहम्मद गाझामध्ये दहशतवादी कारवाया करणार होते, दरम्यान तिघेही हवाई हल्ल्यात मारले गेले.

7 ऑक्टोबर रोजी काय झालं होतं?

7 ऑक्टोबर 2023 पासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. त्यानंतर हमासने इस्रायलवर हल्ला केला, ज्यात 1200 लोक मारले गेले होते. हमासने 250 नागरिकांना बंधकही बनवले होते. 150 ओलीस अजूनही हमासच्या ताब्यात असल्याचा दावा केला जात आहे.

आतापर्यंत 39 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी ठार

इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 39 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचा हमासचा दावा आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की त्यांनी या कारवाईत हमास आणि त्याच्या सहयोगींचे 14 हजारांहून अधिक सैनिकांना ठार केले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+