Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी ! अमेरिकेत ठेवलेले 1200 टन सोने जर्मनी परत घेणार; नेमकं काय आहे कारण? काय होणार? वाचा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदलत्या आर्थिक धोरणांमुळे जगातील सर्वच देश घाबरले आहेत. जर्मनीही अमेरिकेच्या न्यूयाॅर्क बँकेत ठेवलेले त्यांचे सोने, परत मागण्याचा विचारात आहे. द टेलिग्राफच्या मते सध्या जर्मनीचे १२०० टन सोने हे अमेरिकेच्या बँकेत आहे. तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा साठा आहे. मॅनहॅटनमधील यूएस फेडरल रिझर्व्हमधील भूमिगत तिजोरीत तो ठेवला आहे.

Germany wants its gold stored in America back

अमेरिकेत का ठेवले सोने?

दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी बेचिराख झाली. जर्मनी दोन भागांत विभागली गेली. त्यातील पूर्वेकडील भाग हा सेव्हिएत युनिअनच्या ताब्यात होता. तर पश्चिमेकडील भाग अमेरिका व त्यांच्या मित्रपक्षांच्या ताब्यात होता. त्यामुळे पाश्चिमात्य देशांनी पुन्हा युद्धाची भिती ओळखून आपले सोने अमेरिकेत ठेवण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिका ही त्याकाळी सर्वात मोठी शक्ती होती व ती जर्मनीचा जवळचा मित्रही होती, त्यामुळे जर्मनीने अमेरिकेत सोने ठेवले होते.

जर्मनीची किती सोने आहे?

जर्मनीकडे जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या साठ्यांपैकी एक आहे. ज्याचे एकूण वजन ३,३७४ टन आहे. लोकप्रिय जर्मन टॅब्लॉइड 'द बिल्ड' नुसार, त्यात प्रत्येकी १२.५ किलो वजनाचे २,७०,००० सोन्याचे बार आहेत, ज्यांची किंमत सध्या सुमारे २८० अब्ज युरो इतकी विक्रमी आहे. तेच सोने जर्मनीने अमेरिकेत ठेवले होते. अमेरिकेत सोन्याचे साठे ठेवणे त्यावेळी एक शहाणपणाचा निर्णय मानला जात होता. कारण त्यामुळे गंभीर आर्थिक मंदीच्या परिस्थितीत बर्लिनला डॉलरची उपलब्ध होईल, असे जर्मनीचे मत होते.

जर्मनीला सोने परत का हवे?

डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यानंतर अनेक ऐतिहासीक निर्णय घेण्याचा धडाका लावलाय. सध्या अमेरिका हा युरोपातील सर्व देशांवर रागावताना दिसत आहे. तो नाटोमधून माघार घेण्याची भाषाही बोलत आहे. डोनाल्ड ट्रम्प सतत टॅरिफ लावण्याची धमकी देत आहेत. दशकांपूर्वी अमेरिकेबाबत युरोपियन देशांना वाटणारी विश्वासार्हता आता वाटत नाही. दुसरीकडे जर्मनी स्वतः एक स्थिर व मजबूत देश बनला आहे. त्यामुळेच अमेरिकेत असणारे १२०० टन सोने जर्मनीला परत हवे आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+