धक्कादायक..! गौतम अदाणींनी कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच; अमेरिकेत दोषारोप
Adani's indictment in America- अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यावर दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली. अदाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह इतर सात जणांनी सौर ऊर्जा वितरीत करण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना 2,029 कोटी रुपयांची म्हणजेच 265 दशलक्ष डॉलर्सची लाच देऊ केली होती, असा आरोप त्यांच्यावर अमेरिकेतील वकीलांनी केला आहे.

काय आहे अदानी यांच्यावरील आरोप
न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट यूएस ॲटर्नी कार्यालयाने यासंबंधी एक प्रसिद्धीपत्रक दिले आहे. यूएस अतिरिक्त सहायक ॲटर्नी जनरल लिसा एच मिलर यांच्या म्हणण्यानुसार, भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची लाच देणे, गुंतवणूकदार आणि बँकाँशी खोटे बोलणे आणि अब्जावधी रुपये त्यातून गोळा करण्याचा आरोप गौतम अदाणी आणि इतरांवर ठेवण्यात आला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या प्रकरणी अदाणी समूहाशी संपर्क साधला, मात्र त्यावर अदाणी समूहाकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. याआधी अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेनेही आरोप केले होते, मात्र अदाणी समूहाने हे आरोप त्यावेळी तात्काळ फेटाळून लावले होते.
काय म्हणतात अमेरिकेतील सरकारी वकील
अदाणी आणि अदाणी ग्रीन एनर्जीमधील कार्यकारी अधिकारी आणि माजी सीईओ विनीत जैन यांनी कर्जदार आणि गुंतवणूकदारांपासून हा भ्रष्टाचार लपवून ठेवला. 3 अब्ज डॉलरपेक्षा अधिक कर्ज आणि रोखे गोळा केले, असा आरोप अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी केला आहे. गौतम अदाणी यांच्याशिवाय या आरोपात इतर सहा लोकांची नावे आहेत. अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे सीईओ विनीत जैन, रंजीत गुप्ता, रुपेश अग्रवाल, सिरिल कॅबनेस, सौरभ अग्रवाल आणि दीपक मल्होत्रा यांच्या नावाचा समावेश आहे.
लाच प्रकरणात वापरला स्वतःचा मोबाईल
गौतम अदाणी यांच्यावर करण्यात आलेल्या दोषारोपानुसार, या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांनी गौतम अदाणी यांना न्युमेरो युनो आणि द बिग मॅन ही सांकेतीक नावे वापरली होती. लाच देण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी सागर अदाणी यांनी आपला मोबाइल फोन वापरला होता, असाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व आरोपांवर अदानी समुहाकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.












Click it and Unblock the Notifications