Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालंय!

US Former President Bill Clinton : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ एंजल युरेना यांच्या म्हणण्यानुसार बिल क्लिंटन यांना व्हायरल ताप आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी रात्री, 78 वर्षीय क्लिंटन यांना अचानक ताप भरला, त्यामुळे त्यांना रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले. वॉशिंग्टनमधील मेडस्टार जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. क्लिंटन यांची प्रकृती स्थिर असल्याचे युरेना यांनी सांगितले आहे. क्लिंटन यांच्या निकटवर्तीयाने सांगितले की, काळजी करण्याचे कारण नाही, माजी राष्ट्राध्यक्ष बरे होतील. त्यांना फक्त ताप आला होता आणि त्याची तपासणी करायची होती. ते चांगल्या पद्धतीने संवाद देखील साधत आहेत. .

क्लिंटन यांची झालेली आहे बायपास सर्जरी

अध्यक्षपद सोडल्यानंतर क्लिंटन यांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागले होते. 2004 मध्ये न्यूयॉर्क-प्रेस्बिटेरियन हॉस्पिटलमध्ये त्यांची बायपास शस्त्रक्रिया झाली. 2010 मध्ये त्यांना हृदयाचा त्रासही झाला होता जेव्हा त्यांच्या एका हृदयाच्या धमनीत दोन स्टेंट टाकण्यात आले होते. अलीकडे, 2021 मध्ये, कॅलिफोर्नियामध्ये त्यांना लघवीच्या संसर्गामुळे सहा दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Former US President Bill Clinton

क्लिंटन वयाच्या 78 व्या वर्षीही राजकारणात सक्रिय

78 वर्षीय क्लिंटन अजूनही राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत हे विशेष. ते डेमोक्रॅटिक उमेदवारांना पाठिंबा देताना दिसले. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा जोरदार प्रचार त्यांनी नुकत्चाच झालेल्या निवडणुकीत केला होता.

क्लिंटन यांनी भाषणात भावनिक संवाद साधला होता

क्लिंटन यांनी अध्यक्षपद सोडल्यापासून डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये हजेरी लावली आहे. क्लिंटन हे 1976 पासून त्यांच्या भाषणांसाठी ओळखले जातात. त्यांनी ऑगस्ट 2024 मध्ये त्यांच्या सर्वात अलीकडील कार्यक्रमात देखील हजेरी लावली आणि जोरदार भाषण केले. तेव्हा या कार्यक्रमात ते म्हणाले होते की, "मला हे माझ्या मनापासून सांगायचे आहे. यापैकी आणखी किती कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकेन हे मला माहीत नाही."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+