युरोपमधील 3 देशांमध्ये हा विषाणूजन्य आजार वेगाने पसरत आहे, तिन्ही देशाच्या सीमा सील
युरोपमधील काही देशांमध्ये सध्या अराजकतेचे वातावरण आहे. युरोपमधील हंगेरी, ऑस्ट्रिया आणि स्लोवाकिया या देशांमध्ये एका विषाणूने थैमान घातले आहे. ज्यामुळे या देशांमध्ये भंयकर परिस्थिती निर्माण झाली असून या देशांनी आपल्या सीमा सील केल्या आहेत. 50 वर्षांनंतर हंगेरीमध्ये पाय-माऊथ डिसीज (FMD) चा प्रादुर्भाव दिसून आला आहे. ज्यामुळे युरोपमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हा आजार प्राण्यांमधून पसरत असल्याने म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून या प्राण्यांना मारले जात आहे. यामागे मोठे षड्यंत्र असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. दरम्यान हंगेरीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असा दावा केला आहे की, हा विषाणू "नैसर्गिक असू शकत नाही". "जैविक हल्ला" म्हणून तो पसरला असण्याची शक्यता आहे.

डिसेंबर 2024 पर्यंत हंगेरीमध्ये 8.61 लाख गुरे होती, जी युरोपियन युनियनच्या एकूण गुरांच्या साठ्याच्या 1.2% आहे. आता या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी हजारो प्राण्यांची हत्या करण्यात आली आहे. स्लोवाकियाच्या दक्षिण भागातही हा आजार वेगाने पसरत आहे. त्यानंतर ऑस्ट्रियाने हंगेरीसोबतचे 21 आणि स्लोवाकियासोबतचे दोन सीमा क्रॉसिंग बंद केल्या आहेत. तसेच सीमेवर जंतुनाशक केंद्रे उभारण्यात आली आहेत.
असं म्हटले जात आहे की, हा रोग प्राण्यांसाठी खूप धोकादायक आहे. हा रोग गायी, शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये वेगाने पसरतो. म्हणूनच हंगेरीमध्ये या आजाराने संक्रमित 3000 गुरे मारली गेली आहेत. त्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले. असे म्हटले जात आहे की हा रोग मानवांसाठी धोकादायक नाही. दरम्यान ते गुरेढोरे, मेंढ्या आणि शेळ्यांमध्ये वेगाने पसरत आहे, ज्यामुळे ताप आणि तोंडात व्रण येत आहेत.
हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांचे चीफ ऑफ स्टाफ गेर्गेली गुल्यास म्हणाले की, "सध्या आपण हे नाकारू शकत नाही की, हा विषाणू नैसर्गिक नाही. हे शक्य आहे की, आपण कृत्रिमरित्या तयार केलेल्या विषाणूशी लढत आहोत." परदेशी प्रयोगशाळेतून मिळालेल्या तोंडी माहितीवरून हा संशय आल्याचे सांगण्यात आलं आहे. त्याची अद्याप पूर्ण पुष्टी झालेली नाही. जागतिक पशु आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, मार्चमध्ये हंगेरीच्या वायव्य सीमेजवळील एका गुरांच्या फार्ममध्ये हा प्रादुर्भाव पहिल्यांदा दिसून आला. त्यानंतर देशभरातील सुमारे 1000 शेतांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी चार नमुन्यांमध्ये विषाणूची पुष्टी झाली आहे.












Click it and Unblock the Notifications