थरारक! धावत्या कारवर कोसळले विमान; इर्मजन्सी लँडिंगमध्ये गडबड, काळजाचा थरकाप उडवणारा Video!
Plane crash on Highway : अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली. मेरिट आयलंडजवळ एका व्यस्त महामार्गावर तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न करणारे एक छोटे विमान थेट एका धावत्या कारला धडकले. सुदैवाने या भीषण अपघातात मोठी जीवितहानी टळली, मात्र कार चालवणारी वृद्ध महिला जखमी झाली आहे.

इंजिन फेल झाले अन् महामार्गावर...
हा अपघात 'बीचक्राफ्ट 55' मॉडेलच्या एका लहान विमानासोबत झाला. उड्डाणादरम्यान अचानक विमानातील दोन्ही इंजिनांची शक्ती कमी होऊ लागल्याने, २७ वर्षीय वैमानिकाने रस्त्यावरच विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत धोकादायक होता, कारण महामार्गावर वाहतूक सुरू होती. वैमानिकाने आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न केला, मात्र त्याच वेळी विमान थेट एका टोयोटा कॅमरी कारला धडकले.
🚨Breaking News
— Hindu Women (@HinduWomenn) December 10, 2025
Terrifying Video: Plane🛩 crash-lands on top of Toyota car on Florida freeway following engine trouble.
#planecrash #florida #America #SEAGAMES2025 pic.twitter.com/nxMz3ZCUNp
डॅश कॅममध्ये कैद झाला थरार
या संपूर्ण घटनेचा थरार पाठीमागून येणाऱ्या एका कारच्या डॅश कॅममध्ये रेकॉर्ड झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, विमान खाली उतरताना नियंत्रणाबाहेर जाऊन अत्यंत कमी उंचीवर धावत असलेल्या कारला धडकते आणि क्रॅश होते. ब्रेवार्ड काउंटी फायर रेस्क्यूनुसार, i-95 महामार्गावर, कथितरित्या २०१ मैल मार्करजवळ, आपत्कालीन लँडिंगच्या प्रयत्नात संतुलन गमावल्यामुळे हा अपघात घडला.
कारचालक महिला जखमी
या अपघातात कार चालवणारी एक वृद्ध महिला जखमी झाली आहे. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे आणि त्या थोडक्यात बचावल्या आहेत.
फ्लोरिडा पेट्रोलिंग टीमने दिलेल्या माहितीनुसार, विमानात पायलट आणि एक प्रवासी असे दोन लोक होते. हे दोन्ही जण अपघातात पूर्णपणे सुरक्षित आहेत, त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
प्रशासनाकडून चौकशी सुरू!
या दुर्घटनेनंतर नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) ने घटनेची तातडीने चौकशी सुरू केली आहे. विमान इंजिन फेल होण्याची नेमकी कारणे आणि वैमानिकाच्या आपत्कालीन लँडिंगच्या प्रयत्नात झालेल्या त्रुटींची तपासणी केली जाईल. या घटनेने महामार्गांवर अचानक उद्भवणाऱ्या हवाई अपघातांच्या धोक्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.












Click it and Unblock the Notifications