Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

काय सांगता.? 7 गर्लफ्रेंड, आणि 13 मुलं... वाचा एलोन मस्कच्या सगळ्या 'गर्लफ्रेंडचा' इतिहास

ट्विटर विकत घेऊन त्याचे नाव बदलण्यापासून ते थेट मार्क झुकेरबर्गला आव्हान देण्यापर्यंत टेस्लाचे सीईओ एलोन मस्क याचा प्रवास चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. आता अँशले सेंट हिने आपण एलोन मस्कच्या १३ व्या मुलाला जन्म दिल्याचा दावा केल्याने, एकच चर्चा सुरु झाली आहे. कशी आहे, एलोन मस्कची लव्हस्टोरी? कोण-कोण आलंय त्या्च्या आयुष्यात? याच विषयी आपण आज माहिती करुन घेऊ...

Elon Musk Affairs

जेनिफर ग्वेन (१९९४-१९९५)

एलोन मस्कची सर्वात पहिली प्रेयसी होण्याचा मान जेनिफर ग्वेन हिला जातो. हे दोघेही १९९० च्या दशकात पेनसिल्व्हेनिया विद्यापिठात शिकत होते. तेथेच ते दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र ही लव्हस्टोरी फक्त एक वर्ष टिकली. मस्कने जेनिफरच्या वाढदिवसाला पन्ना हार भेट दिला असल्याचेही काही बातम्यांत म्हटले आहे. मात्र त्यानंतर पुढच्याच वर्षी जेनिफर परदेशात शिक्षणासाठी गेली आणि ही लव्हस्टोरी अर्धवट राहिली.

जस्टिन विल्यम्स (१९९-२००८)

१९९० च्या दशकाच्या शेवटी एलोन मस्क कॅनडातील ओंटारिया विद्यापीठात शिकत असताना त्याची जस्टिनशी ओळख झाली. जस्टिन ही पहिल्या वर्षात तर मस्क हा दुसऱ्या वर्षात शिकत होता. या दोघांनी २००० मध्ये लग्न केल्याचे सांगितले जाते. त्यांना २००२ मध्ये मुलगा झाला मात्र तो पहिलाच मुलगा दहा महिन्यांचा असताना वारला. त्यानंतर २००४ मध्ये त्यांनी ग्रीफीन व विवियन ही जुळी मुले झाली. त्यानंतर २००६ पर्यंत काई, सॅक्सन व डॅनियम ही अजून तीन मुले झाल्याचे सांगितले जाते.

तालुलाह रिले (२००८-२०१६)

जस्टिनला आयुष्यातून काढल्यानंतर एलोन मस्कचे सूत अभिनेत्री तालुलाह रिलेसोबत जुळले. विशेष म्हणजे तालुलाह सोबत तिचे अनैतिक संबंध सुरु असताना त्याने जस्टिनला घटस्फोटही दिला नव्हता. २०१० मध्ये एलोन मस्कने तालुलाह रिले हिच्यासोबत लग्न केले. परंतु दोन वर्षांतच या दोघांचे भांडण घटस्फोटापर्यंत गेले. परंतु २०१३ मध्ये ते पुन्हा एकत्र आले आणि पुन्हा लग्न केले. परंतु ते दोघेही २०१६ मध्ये घटस्फोट न घेता वेगळे झाले.

अंबर हर्ड (२०१६-२०१८)

एलोन मस्क आणि अंबर हर्ड यांनी गुप्तपणे 2015 मध्ये डेटिंग सुरू केली. २०१६ मध्ये ते पुन्हा वेगळे झाले. त्यानंतर पुन्हा एकत्र आले. परंतु ऑगस्ट 2017 मध्ये ते पुन्हा वेगळे झाले. अंबर हर्डसोबतही एलोनने दोनदा ब्रेकअप व दोनचा जुळवून घेतले.

ग्रिम्स (२०१८-२०२२)

एलोन मस्क आणि गायक- संगीतकार ग्रिम्स यांनी 2018 मध्ये डेटिंग करण्यास सुरुवात केली. त्यांनी मे 2020 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे जन्म दिला. त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये सरोगेटद्वारे आणि पुन्हा 2022 मध्ये त्यांच्या तिसऱ्या मुलाला जन्म दिला. म्हणजेच ग्रिम्पसापासून एलोनला तीन मुले झाली.

शिवोन झिलिस (आत्तापर्यंत)

मस्क आणि शिवोन झिलिस यांचे प्रकरण २०२२ मध्ये उघडकीस आले. एरोन मस्कच्या न्यूरालिंक कंपनीत शिवोन ही उच्चपदस्थ अधिकारी आहे. या दोघांनी लग्न न करताच २०२१ मध्येच दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता. मुलाला पालकाचे नाव देण्याच्या प्रकरणावरुन या दोघांचे प्रकरण उघड झाले.

अँशले सेंट (आत्तापर्यंत)

नुकताच ॲशले सेंट क्लेअर हिने आपण एलोन मस्कच्या 13व्या मुलाला जन्म दिल्याचा दावा केला आहे. तिने सांगितले की तिच्या पोटात वाढलेले एलोनचे मुल सध्या 5 महिन्यांचे आहे. अँशलेच्या दाव्यानंतर एलोन मस्क पुन्हा चर्चेत आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+