एलन मस्क यांनी सोडली डोनाल्ड ट्रम्प यांची साथ?, अतिशय जवळच्या मित्रांमध्ये का निर्माण झाला दुरावा?
Elon Musk Vs Donald Trump over US Big Beautiful Bill : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तथा उद्योगपती एलन मस्क यांना अमेरिकेतील सर्वात शक्तिशाली जोडपे म्हटले जात होते. पण आता टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनापासून स्वत:ला दूर केले आहे. आपले खास मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून दोन हात लांब राहणेच त्यांनी पसंद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी एलन मस्क यांनी DOGE प्रभारी पदावरून राजीनामा देण्याची घोषणा केली, ज्यामध्ये त्यांना अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून वर्णन केले गेले होते. परंतु ट्रम्प आणि मस्क यांच्यातील संबंधामध्ये काही तरी घडल्याने मस्क यांनी आता रामराम करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, दोन्ही नेत्यांमघ्ये नेहमीच संबंध हे चढ-उतारांनी भरलेले राहिले आहेत, कारण ट्रम्प यांचे सर्वात जवळचे होण्यापूर्वी, मस्क त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी देखील होते.

नेमकं काय घडलं?
जगातील सर्वात प्रसिद्ध अब्जाधीश आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज एलन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील त्यांच्या भूमिकेची समाप्ती जाहीर केली. त्यांनी सरकारी खर्च कमी करणाऱ्या सरकारी कार्यक्षमता विभागातील म्हणजेच DOGE मधील त्यांची जबाबदारी आता संपत आहे, असे जाहीर केले.
एलन मस्क यांची 'विशेष सरकारी कर्मचारी' म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, ज्यांची निश्चित मर्यादा एका वर्षात जास्तीत जास्त 130 दिवसांची सेवा आहे. ट्रम्प यांचा कार्यकाळ 20 जानेवारीपासून सुरू झाला असे मानले जात होते आणि या आधारावर मस्क यांचा कार्यकाळ मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण झाला.
ट्रम्प यांचे सोशल मीडियावर मानले आभार
मस्क यांनी एक्स वर ट्रम्प यांचे आभार मानले (ट्विटर) आणि म्हणाले, 'एसजीई म्हणून माझा कार्यकाळ संपत असताना, मी अध्यक्ष ट्रम्प यांचे फालतू खर्च कमी करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानू इच्छितो. त्यांनी असेही लिहिले की त्यांना विश्वास आहे की डोगे एजन्सी कालांतराने अधिक मजबूत होईल आणि ती सरकारमधील नवीन विचारसरणीचे प्रतीक बनेल.
व्हाईट हाऊसच्या सूत्रांनी पुष्टी केली
'ऑफबोर्डिंग' बुधवारपासून सुरू होईल व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सेमाफोर न्यूज प्लॅटफॉर्मला माहिती दिली की मस्कची 'ऑफबोर्डिंग प्रक्रिया' बुधवार रात्रीपासून सुरू होईल. म्हणजेच, आता मस्क प्रशासकीय भूमिकेत कोणताही भाग घेणार नाहीत.
ट्रम्प यांच्या या निर्णयावर मस्क नाराज?
एलन मस्क यांनी अशावेळी स्वत:ला बाजूला केले आहे की, यापूर्वी त्यांनी ट्रम्प यांच्या बहुचर्चित विधेयकावर टीका केली होती, ज्यामध्ये संरक्षण बजेट वाढवणे तसेच ट्रिलियन डॉलर्सच्या कर सवलतींचा समावेश आहे. त्यांनी या विधेयकाचा उघडपणे निषेध केला. सूत्रांच्या मते, हा वैचारिक संघर्ष निर्माण झाल्याने एलन मस्क यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
मस्क आता राजकारणातून पूर्णपणे बाहेर पडतील का?
मस्क भविष्यात कोणत्याही सरकारी भूमिकेत असतील की नाही याची पुष्टी मस्क यांनी केली नसली तरी, ते म्हणतात की सरकारमधील वाया घालवणारा खर्च थांबवण्याचा विचार जीवनशैली बनला पाहिजे - जे सूचित करते की भविष्यात ते पुन्हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सामील होऊ शकतात.
DOGE म्हणजे नेमकं काय आहे?
DOGE हा अधिकृत सरकारी विभाग नाही, कारण कोणताही सरकारी विभाग केवळ अमेरिकन संसदेच्या (Congress) कायद्याने स्थापित केला जाऊ शकतो. त्याऐवजी, ही सल्लागार संस्था अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशाद्वारे तयार केली होती. त्या आदेशानुसार, सरकारी कामात गती वाढविण्यासाठी आणि कार्यक्षमता आणण्यासाठी आयटी प्रणाली अपग्रेड करणे हे DOGEचे प्रमुख ध्येय राहिले आहे. या संस्थेला जुलै 2026 पर्यंत त्यांचे काम पूर्ण करायचे आहे.
मस्क नंतर DOGE ची कमान कोण स्वीकारेल?
आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की, एलन मस्क नंतर DOGE ची कमान कोण स्वीकारेल? या महिन्याच्या सुरुवातीला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळाचे 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त एलोन मस्क माध्यमांशी बोलत होते तेव्हा त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या वरिष्ठ सल्लागार पदावरून राजीनामा देऊ शकतात असे संकेत दिले होते.
त्यांच्यानंतर DOGE चे नेतृत्व कोण करेल असे विचारले असता, मस्क म्हणाले की DOGE ही बौद्ध धर्मासारखीच एक जीवनशैली आहे. बौद्ध धर्माला बुद्धाची गरज होती का? बुद्ध गेल्यानंतर बौद्ध धर्म अधिक मजबूत झाला नाही का?, टेस्लाच्या सीईओने सांगितले की ज्याप्रमाणे बुद्धाशिवाय बौद्ध धर्म चालू राहिला, त्याचप्रमाणे DOGE त्यांच्याशिवायही चालू राहील. जेव्हा मस्कला विचारले गेले की DOGE काम करणे थांबवेल का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, 'नाही, मला वाटते की ते अधिक गती घेईल.'












Click it and Unblock the Notifications