PM मोदींशी असं काय बोलणं झालं की, एलोन मस्क भारतभेटीवर येताहेत? स्वतः सांगितली भेटीची तारीख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर बोलणे झाल्यानंतर टेस्लाचे अध्यक्ष एलोन मस्क यांनी त्यांचा भारत दौरा जाहीर केला. टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी २०२५ च्या अखेरीस भारताला भेट देणार असल्याचे सांगितले. टेस्ला भारतीय बाजारपेठेत त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा लाँच करण्याची तयारी करत आहे. मस्कने X वर पोस्ट केले आणि म्हटले की पंतप्रधान मोदींशी बोलणे ही त्यांच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.

मोदी-मस्क यांची चर्चा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्कानंतर भारत आणि अमेरिकेत व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी आणि एलोन मस्क यांच्यातील संभाषण खूप महत्त्वाचे मानले जात आहे. ट्रम्प सरकारमध्ये मस्क यांची मोठी भूमिका आहे. त्यामुळेच मस्क यांनी दोन दिवसांपूर्वी पीएम मोदी यांच्याशी भारतातील उद्योगाबाबत चर्चा केली होती. त्यानंतर आता ते थेट भारतात भेट देण्याची तयारी करत आहेत.
It was an honor to speak with PM Modi.
— Elon Musk (@elonmusk) April 19, 2025
I am looking forward to visiting India later this year! https://t.co/TYUp6w5Gys
पीएम मोदींनीही दिली माहिती
मस्कसोबतच्या संभाषणाची माहिती पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटले की, आम्ही तंत्रज्ञान आणि नवोपक्रमात सहकार्याच्या अफाट शक्यतांवर चर्चा केली आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या २१ एप्रिल ते २४ एप्रिल या कालावधीत भारत भेटीनंतर लगेचच ही चर्चा झाली. त्यांच्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी लिहिले की, "या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या आमच्या भेटीदरम्यान चर्चेत आलेल्या मुद्द्यांसह एलोन मस्क यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. आम्ही तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात सहकार्याच्या प्रचंड क्षमतेवर चर्चा केली. भारत या क्षेत्रांमध्ये अमेरिकेसोबतची भागीदारी पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहे."
मस्क भारतात टेस्ला लाँच करणार
एलोन मस्क भारतात त्यांची टेस्ला कार लाँच करण्याची तयारी करत आहेत. येत्या काही महिन्यांत टेस्ला मुंबईजवळील बंदरावर काही हजार गाड्या पाठवून भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची तयारी करत आहे. टेस्ला या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये कारची विक्री सुरू करण्याची योजना आखत आहे. याबाबतची माहितीही त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन दिली. त्यासाठी ते यावर्षीच्या शेवटी भारतात भेट देणार आहेत.












Click it and Unblock the Notifications