Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Elon Musk ने लाँच केलं जगातील सर्वात पाॅवरफूल AI माॅडेल! काय आहे Grok3 ची खासियत? घ्या जाणून

Elon Musk launches AI Grok 3 : दिग्गज उद्योजक एलाॅन मस्क यांनी आपले नवे एआय बाॅट लाँच केले आहे. हे एआय बाॅट जगातील सर्वात पाॅवरफूल असल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय तो या विश्वातील सर्वात स्मार्ट एआय असल्याचेही बोलले जात आहे. Grok3 असे या एआयचे नाव आहे.

मस्क यांच्या कंपनीने स्पष्ट केले की, Grok3 एआय इतर कंपनीच्या माॅडेलपेक्षा गणित, आकलनक्षमता आणि विज्ञानाच्या बाबतीत सरस आहे. विशेष म्हणजे Grok3 हे प्रिमियम युजर्ससाठी सध्या लाँच केले गेले आहे कंपनीने हेही स्पष्ट केले की, लवकरच याचा API ही जारी केले जाईल.

Elon Musk launches world s most powerful AI Grok3

Grok3 लाँच झाल्यानंतर काय म्हणाले एलाॅन मस्क?

Grok3 लाँच झाल्यानंतर एलन मस्क यांचा दावा आहे की, हे एआय माॅडेल विश्वातील सर्वात स्मार्ट असेल. हे एआय माॅडेल दोन लाख जीपीयुच्या मदतीने प्रशिक्षित केला गेलेला आहे. काही दिवसांपासून एक्स या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर या एआयचे टिझरही जारी झाले होते.

एआय माॅडेल बनवण्याची जागतिक स्पर्धा

सांगायचे झाल्यास जगात सध्या एकापेक्षा एक सरस एआय माॅडेल बनवले जात आहे. यामध्येही स्पर्धा निर्माण झाली आहे. खासकरुन चिनी एआय माॅडेलने बाजारात धुमाकूळ घातला. अमेरिकन एआय माॅडेलच्या तुलनेत चिनी माॅडेल कमी खर्चात तयार होत आहेत.

ओपन एआय च्या जीपीटी 4० सर्वात कमजोर असल्याचे एलाॅन मस्क यांनी त्यांच्या सादरीकरणात दाखवले आहे. मस्क आणि त्यांच्या टीमचा दावा आहे की, Grok3 च्या तुलनेत जीपीटी 4० एक परफाॅर्मर आहे आणि
Grok3 मध्ये अद्यावत आकलन क्षमता मिळते, काळानुसार ती अधिक चांगली असेल.

Grok3 एआय माॅडेलची विशेषता

Grok3 एआय माॅडेलच्या संदर्भात आजतकने वृत्त दिले आहे. त्यानुसार, एलाॅन मस्क आणि सॅम आॅल्टमन यांच्यामध्ये वाढत्या स्पर्धेचा विचार केल्यास Grok3 एआय माॅडेल महत्वपूर्ण आहे. विशेष बाब म्हणजे मस्क यांनी सॅम ऑल्टमॅन आणि ओपन एआय च्या मंडळाला कंपनी खरेदी करण्यासाठी 97.4 अब्ज डाॅलरची ऑफर दिली, मात्र ती ओपन एआय आणि ऑल्टमॅन यांनी नाकारली. त्यानंतर मस्क यांनी Grok3 हे एआय लेटेस्ट व्हर्जन लाँच केले.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+