डोनाल्ड ट्रमच्या प्रचारासाठी एलन मस्कने दिले साडेसहा हजार कोटी; नेमकं काय आहे कारण..?
US Presidential Election 2024 : माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व कमला हॅरिस यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. रिपब्लिकन पक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. निवडणुकीपूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अनेक बड्या व्यक्तींकडून पाठिंबा मिळताना दिसत आहे.
अमेरिकेतील व जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती समजल्या जाणाऱ्या टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनीही ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे, मस्क यांनी ट्रम्प यांना केवळ पाठिंबा दिला नाहीत, तर त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी आर्थिक मदतही केली.

मस्क यांनी दिले साडेसहा हजार कोटी
मस्क आता दर महिन्याला 75 दशलक्ष डाँलर इतकी देणगी ट्रम्प यांना प्रचारासाठी देणार आहेत. भारतीय चलनानुसार याची किंमत 6,301 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराला आर्थिक मदत लावणार असल्याचे वृत्त मंगळवारी प्रकाशित झालेल्या यूएस फेडरल इलेक्शन कमिशनने दिले. मस्क यांनी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत अमेरिका PAC ला 74.9 दशलक्ष डाँलरची देणगी दिली. ट्रम्प हे 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.
ट्रम्प यांची उमेदवारी घोषित
अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काही दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. प्रचारसभेला संबोधित करत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. मात्र या प्राणघातक हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची उमेदवारी चांगलीच भक्कम झाली. सोमवारी रात्री मिलवॉकी शहरात झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात ट्रम्प यांना 2,387 प्रतिनिधी मते मिळाली. उमेदवार निवडण्यासाठी 1215 मतांची आवश्यकता आहे. त्यानंतर पक्षांनी ट्रम्प यांना अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. उपाध्यक्षपदासाठी 39 वर्षीय जेम्स डेव्हिड व्हॅन्स यांचे नामांकन जाहीर करण्यात आले.












Click it and Unblock the Notifications