एलन मस्क यांची मुलगी विवियनचा वडिलांवर गंभीर आरोप; लिंग-निवडक IVF अन् मुलगी नको मुलाचाच हट्ट...
Elon Musks daughter Vivian Wilson : टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांची मुलगी विवियन जेना विल्सन हीने सोमवारी तिच्या वडिलांवर पुन्हा एका मोठा गंभीर आरोप केला आहे.
विवियनने केलेला आरोप वाचून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची मानसिकता किती घाणरडी असू शकते, याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. चला तर जाणून घेऊया नेमका काय केला आरोप नेमका काय झालाय वाद, याविषयी..!
झेवियर मस्क (आता नाव बदलले विवियन जेना विल्सन म्हणून ओळखले जाते) हीने तिच्या वडिलांवर गंभीर आरोप केला. ती म्हणाली की, वडिलांनी मुलाचा जन्म सुनिश्चित करण्यासाठी लिंग-निवडक IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन) वापरला आहे.
मी एक वस्तू, जी खरेदी केली गेली
विवियन जेना विल्सन म्हणाली की, तिचे वडील मस्क यांनी जेव्हा तीला कंसीव केले होते तेव्हा लिंग-निवडक इन-विट्रो फर्टिलायझेशन (IVF) वापरला होता. जन्माच्या वेळी माझे नियुक्त केलेले लिंग ही एक वस्तू होती, जी खरेदी केली जात होती आणि त्यासाठी पैसे दिले जात होते, असे विवियन जेना विल्सन हीने सोशल मीडिया थ्रेड्सवर एक पोस्टद्वारे खुलासा केला.

..त्यानंतर ट्रान्सजेंडर झाले
ती पुढे म्हणाली, जेव्हा मी लहानपणी एक महिला होते आणि नंतर ट्रान्सजेंडर झाले, तेव्हा मी विकल्या जाणाऱ्या उत्पादनाच्या विरोधात जात होते. आयुष्यभर ज्या पुरुषत्वाच्या अपेक्षेविरुद्ध मला बंड करावे लागले ते एक आर्थिक व्यवहार होता. पैशाचा व्यवहार, त्याला मला तोंड द्यावे लागले.
विवियनने शस्त्रक्रियेनंतर वडिलांचे नाव सोडले
2022 मध्ये झालेल्या शस्त्रक्रियेनंतर विवियनने सांगितले होते की, तिला तिचे वडील एलन मस्क यांच्यासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत. विवियनने तिच्या नावातून मस्क काढून तिच्या आईचे आडनाव वापरले होते.
मुलगा ते मुलगी होण्यासाठी अर्ज केल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच मस्क यांनी रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा दिला होता, असे मानले जात होते की या समर्थनाचे कारण अमेरिकेतील ट्रान्सजेंडर्सच्या अधिकारांवर मर्यादा घालण्याचे समर्थन आहे. विवियनची आई जस्टिन विल्सन कॅनेडियन लेखिका आहे. क्वीन्स कॉलेजमध्ये शिकत असताना 2000 मध्ये त्यांची मस्कशी भेट झाली.
आयव्हीएफद्वारे 5 मुलांचा जन्म..
दोघांच्या भेटीनंतर दोघांनी लग्न केले आणि 2008 मध्ये घटस्फोट घेतला. 2004 मध्ये, या जोडप्याने IVF च्या माध्यमातून विवियन आणि ग्रिफिन या जुळ्या मुलांचे स्वागत केले. 2006 मध्ये, त्यांना IVF द्वारे काई, सॅक्सन आणि डॅमियन हे तिळेदेखील होते.
फोर्ब्स 2022 च्या अहवालात काय दावा
2022 च्या फोर्ब्सच्या अहवालानुसार, एलन मस्क यांचे वर्णन "पुनरुत्पादनासाठी अभियांत्रिकी दृष्टिकोन" असे करण्यात आला आहे. ज्यामध्ये त्यांच्या किमान 5 मुलांची गर्भधारणा आयव्हीएफद्वारे झाल्याची पुष्टी देखील केलेली आहे. जन्माच्या वेळी पाचही बाळ मुलगा म्हणूनच गृहीत धरले गेले होते.
फोर्ब्सच्या 2022 च्या अहवालानुसार, त्यापैकी किमान पहिली पाच मुले आयव्हीएफ द्वारे गर्भधारणा झाली होती, ज्या सर्वांना जन्माच्या वेळी पुरुष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ज्यामध्ये मस्कचे वर्णन "पुनरुत्पादनासाठी अभियांत्रिकी दृष्टिकोन" असा केला गेला होता.
अमेरिकेत काय आहे कायदा?
या अहवालात मस्कच्या आयव्हीएफच्या वापराबद्दलही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. प्रत्यारोपणापूर्वीच्या टप्प्यावर त्यांची पहिली मुले पुरुष म्हणून निवडली गेली होती का?, युनायटेड स्टेट्समध्ये लिंग-निवडक आयव्हीएफ कायदेशीर असला तरी, मुलाचे लिंग निवडण्याच्या विवादित नैतिकतेमुळे ते वादग्रस्त आहे. लोकांनी मुलाचाच आग्रह करू नये म्हणून भारत, कॅनडा आणि चीन सारख्या अनेक देशांमध्ये कायदा करण्यात आलेला आहे.
मस्क यांनी मुलीच्या दाव्यावर कोणतेही भाष्य केले नाही
एलन मस्क यांनी अद्याप त्यांच्या मुलींच्या दाव्यांवर भाष्य केलेले नाही. 2022 मध्ये, विल्सनने कायदेशीररित्या तिचे नाव आणि लिंग बदलले आणि म्हटले की ती आता तिच्या जैविक वडिलांसोबत राहत नाही किंवा तिच्याशी संबंध ठेवू इच्छित नाही. 2024 मध्ये एका पॉडकास्ट कार्यक्रमादरम्यान, मस्कने दावा केला की विल्सनचा मृत्यू "वेक माइंड व्हायरसने झाला", हा दावा त्याच्या मुलीने फेटाळून लावला. एनबीसी न्यूजला दिलेल्या तिच्या पहिल्या सार्वजनिक मुलाखतीत, विवियन जेना विल्सनने दावा केला की तिचे वडील तिच्या ओळखीबाबत क्रूर आणि दुर्लक्षित होते.












Click it and Unblock the Notifications