Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नेपाळनंतर, भारताच्या या मित्र देशात हिंसक निदर्शने; सरकारविरुद्ध लोक संतप्त, पोलिसांचा लाठीचार्ज!

France protests 2025 : नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या 'जनरल झेड' आंदोलनानंतर आता युरोपातील मैत्रीपूर्ण देश फ्रान्समध्येही तसाच जनक्षोभ उसळला आहे. सरकारची आर्थिक धोरणे आणि वाढत्या आर्थिक संकटाविरोधात फ्रान्समधील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. बुधवारी (१० सप्टेंबर) सकाळी राजधानी पॅरिससह प्रमुख शहरांमध्ये निदर्शक आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला.

France Protests Erupt

'ब्लॉक एव्हरीथिंग' मोहिम आणि हिंसक निदर्शने

'ब्लॉक एव्हरीथिंग' या मोहिमेमुळे संपूर्ण फ्रान्समधील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. निदर्शक रस्ते, रेल्वे हब आणि पेट्रोल पंपांना लक्ष्य करत आहेत. एकट्या पॅरिस शहरात आतापर्यंत २०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. पॅरिस, बोर्डो आणि मार्सेलसारख्या शहरांमध्ये आंदोलकांनी कचऱ्याचे डबे जाळून पोलिसांवर बाटल्या आणि ज्वलनशील पदार्थ फेकले. रेल्वे स्थानकांवर निदर्शकांनी गर्दी केल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

आंदोलन का भडकले?

फ्रान्स सध्या एका मोठ्या राजकीय आणि आर्थिक संकटाचा सामना करत आहे. नुकतेच पंतप्रधान फ्रँकोइस बायरो यांना संसदेत बहुमत सिद्ध करता आले नाही, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी सेबास्टियन लेकोर्नू यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे. बायरो यांनी देशाचे वाढते कर्ज कमी करण्यासाठी ३.७ लाख कोटी रुपयांची कपात योजना जाहीर केली होती.

या योजनेचा थेट परिणाम सामान्य लोकांच्या जीवनावर झाला, कारण अनेक सामाजिक आणि आर्थिक सुविधांमध्ये कपात करण्यात आली. आधीच बेरोजगारी, महागाई आणि गरीब-श्रीमंत यांच्यातील वाढलेली दरी यामुळे त्रस्त असलेल्या जनतेचा रोष या निर्णयामुळे अधिकच वाढला.

तरुण, कामगार आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. हे आंदोलन केवळ आर्थिक निर्णयांविरुद्ध नाही, तर अनेक वर्षांच्या बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक असमानतेविरुद्धचा उद्रेक आहे, असे लोकांचे म्हणणे आहे.

सरकारची आक्रमक भूमिका

वाढता हिंसाचार पाहता, फ्रान्स सरकारने कडक पाऊले उचलली आहेत. संपूर्ण देशभरात ८०,००० हून अधिक पोलिस आणि सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि सामान्य जनतेची सुरक्षा सुनिश्चित करणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर काही गटांनी दुकाने आणि पेट्रोल पंप लुटण्याचे आवाहन केले असल्याने, पोलिसांनी अशा कोणत्याही हिंसक कृत्याला गांभीर्याने घेतले जाईल असा इशारा दिला आहे.

सरकारने जनतेला कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मात्र, दिवस जसजसा पुढे जाईल, तसतशी गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. फ्रान्समधील या राजकीय अस्थिरतेने आता सामाजिक आंदोलनाचे रूप धारण केले असून, तेथे शांतता प्रस्थापित करणे सरकारसाठी एक मोठे आव्हान बनले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+