Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Turkey Earthquake :तुर्कीयेच्या इस्तंबूलला भूकंपाचे जोरदार धक्के; रिश्टर स्केलवर 6.2 तीव्रतेची नोंद

Earthquake in Turkey : तुर्कियेच्या इस्तंबूलमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. त्यामुळे या भागातील लोकांमघ्ये घबराट पसरली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच या भागात विनाशकारी भूकंप झाला होता. त्यानंतर आज बुधवारी पुन्हा भूकंपाचे जोरदार धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 6.2 असल्याची नोंद रिश्टर स्केलवर झाली. दरम्यान, या भूकंपामुळे किती नुकसान झाले, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

Earthquake of magnitude

जर्मन भूगर्भीय संशोधन केंद्राने (GFZ) तसेच तुर्कीच्या आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 6.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाने इस्तंबूल हादरले आहे. कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा जखमी झाल्याचे तात्काळ वृत्त नाही.

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल आणि त्याची खोली 10 किलोमीटर होती. इस्तंबूलच्या नैऋत्येस सुमारे 40 किलोमीटर अंतरावर मारमारा समुद्रात या भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगितले गेले.

तुर्कीयेत वारंवार भूकंप का होतात?

6 फेब्रुवारी 2023 रोजी 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे आणि काही तासांनंतर आलेल्या दुसऱ्या शक्तिशाली भूकंपामुळे दक्षिण आणि आग्नेय तुर्की प्रांतांमध्ये लाखो इमारती उद्ध्वस्त झाल्या होत्या, हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच करोडो रुपयांचे नुकसान देखील झाले होते. या भूकंपात सुमारे 53 हजार लोक मृत्यूमुखी पडले होते. तसेच शेजारच्या सीरियाच्या उत्तरेकडील भागात आणखी 6 हजार लोक मृत्यूमुखी पडले होते. दरम्यान, तुर्कीयेत वारंवार भूकंप होत असल्याच्या घटना गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. त्याचे कारण देखील सांगितले जात आहे. या भागातील वातावरण त्याला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.

बाल्कनीतून उडी मारल्याने काही लोक जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी तुर्कीमध्ये सार्वजनिक सुट्टी होती. अशातच भूकंपाचे धक्के जाणवू लागल्यानंतर काही लोकांनी इमारतीमधून उड्या मारून मोकळ्या जमीनीवर जाण्याचा प्रयत्न केला. बाल्कनीतून उडी मारल्याने काही लोक जखमी झाल्याची माहिती ब्रॉडकास्टर टीजीआरटीने दिली आहे.

नुकसानग्रस्त इमारतीमध्ये न जाण्याचा इशारा

दुसरी बाब म्हणजे, एएफडीएने या भागात ज्या इमारतींचे नुकसान झाले आहे, अशा इमारतींमध्ये जाण्यापासून रोखले आहे. भूकंपामुळे किती नुकसान झाले, याबाबत अद्याप वृत्त समोर आलेले नाही. परंतु भूकंपामुळे लोकांनी इमारती रिकाम्या केल्या आहेत. बॉस्फोरस समुद्रधुनीच्या युरोपियन आणि आशियाई किनाऱ्यावर वसलेल्या शहराला सर्वाधिक धक्के बसल्याचे वृत्त आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+