myanmar earthquake : इमारती कोसळल्या, लोक पळू लागले, किंकाळ्या अन् रडणं, VIDEOतून पाहा भूकंपाचा थरार

Myanmar earthquake Update News : शुक्रवारी म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) नुसार, भूकंपाचे केंद्र 10 किलोमीटर खोलीवर होते आणि त्याचे केंद्र मंडाले शहराजवळ होते.

भूकंपाचे धक्के थायलंडची राजधानी बँकॉकपर्यंत जाणवले. येथे एक बांधकामाधीन असलेला उड्डाणपूल कोसळला. त्याच वेळी, शेकडो लोक घाबरून इमारतींमधून बाहेर आले. म्यानमारमध्ये झालेल्या या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची अद्याप कोणतीही माहिती नाही.

Earthquake in Myanmar

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी मोठे नुकसान झाले आहे. या विध्वंसाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात लोक ओरडताना, घावताना तसेच मोठ्या मोठ्या इमारती यात कोसळत असल्याचे दिसून येत आहे.

बँकॉकमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये इमारती पत्त्यांच्या गठ्ठ्यासारख्या कोसळताना दिसत आहेत. लोक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसत आहेत. संपूर्ण शहरात गोंधळाचे वातावरण आहे.

म्यानमारच्या मंडाले शहरात इमारती उद्ध्वस्त

म्यानमारमधील ऐतिहासिक राजवाडा मंडाले पॅलेसच्या काही भागांचे नुकसान झाले आहे. त्याच वेळी, भूकंपात सागाईंग प्रदेशातील सागाईंग टाउनशिपमधील एक पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.

राजधानी नायपिताव व्यतिरिक्त, क्युक्से, पिन ओओ ल्विन आणि श्वेबो येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या शहरांची लोकसंख्या ५० हजारांपेक्षा जास्त आहे.

म्यानमारमध्ये सातत्याने होताहेत भूकंप

थायलंडपेक्षा म्यानमारमध्ये भूकंप तुलनेने जास्त सामान्य आहेत. 1930 ते 1955 दरम्यान, देशाच्या मध्यभागी असलेल्या सागाईंग फॉल्टजवळ 7.0 तीव्रतेपेक्षा जास्त तीव्रतेचे सहा शक्तिशाली भूकंप झाले आहेत, असे वृत्त एएफपीने यूएसजीएसच्या हवाल्याने दिलेले आहे.

थायलंड भूकंपाच्या झोनमध्ये नाही आणि तिथे जाणवलेले जवळजवळ सर्व भूकंप, जे दुर्मिळ आहेत. ते शेजारच्या म्यानमारमध्ये होतात. बँकॉकमधील इमारती शक्तिशाली भूकंपांना तोंड देण्यासाठी डिझाइन केलेल्या नसल्यामुळे येथील इमारतींना मोठे नुकसान होऊ शकते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+