Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Chile Earthquake :चिलीमध्ये 7.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाने जमीन हादरली; लोकांनी घरे सोडली, अलर्ट जारी

Chile-Argentina Earthquake Latest News : दक्षिण अमेरिकेतील दोन देश असलेले अर्जेंटिना आणि चिलीमध्ये भूकंपाच्या धक्यांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांमध्ये घबराट सुटली आहे.

अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण यांच्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4 इतकी नोंदवली गेली आहे. हा भूकंप समुद्रामध्ये झाला. ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरातही हालचाल जाणवल्या. देशाच्या दक्षिणेकडील भागात राहणाऱ्या लोकांना त्यांचे घरे रिकामे करून सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.

earthquake in chile argentina

प्रशासनाकडून त्सुनामीचा इशारा जारी

चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी सोशल मीडिया X वर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी सांगितले की, किनारी भाग रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तीव्र भूकंपानंतर त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या वतीने सांगण्यात आले की, त्सुनामीच्या इशाऱ्यामुळे, मॅगालेन्स प्रदेशातील किनारी भागात सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. लोकांनी त्वरीत काळजी घ्यावी, सुरक्षित ठिकाणी जावे, असे आवाहन त्यांनी केलेले आहे.

earthquake in chile argentina

जीवाच्या आकांताने लोकांनी घरे सोडली

यूएसजीएसने सांगितले की भूकंपाचे केंद्र अर्जेंटिनाच्या उशुआइया शहरापासून 219 किलोमीटर दक्षिणेस समुद्राखाली होते. भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे लोक घरे सोडून रिकाम्या जागी पळू लागले. सध्या कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. स्थानिक माध्यमांच्या नुसार, चिलीतील पुंता एरेनास आणि अर्जेंटिनामधील रिओ गॅलेगोस या शहरांमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत.

मॅगालेन्स सर्वात कमी लोकसंख्या असलेला प्रदेश

मॅगालेन्स हा चिलीचा सर्वात मोठा आणि दक्षिणेकडील प्रदेश आहे. सर्वात कमी लोकसंख्या असलेला प्रदेश आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2017 मध्ये त्यांची एकूण लोकसंख्या सुमारे 1 लाख 66 हजार होती. चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक म्हणाले की, भूकंपाचा सामना करण्यासाठी देशाकडे सर्व संसाधने सुविधा आहेत. चिली आणि अर्जेंटिना भूकंपाच्या बाबतीत संवेदनशील क्षेत्रात येतात, कारण हा प्रदेश रिंग ऑफ फायर नावाच्या भूमीत समाविष्ट असल्याचे सांगितले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+