Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ट्रम्प यांच पुन्हा डोकं फिरलं! झेलेन्स्कीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही धुतलं, Video

Donald Trump Cyril Ramaphosa Debate : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांचा संताप काही त्यांच्या देशातील किंवा कार्यालयातील माणसांवर नव्हता. तर गेल्या वेळी ज्या पद्धतीने त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यश्र झेलेन्स्की यांच्यावर निशाणा साधला होता. अगदी तसाच काहीसा प्रकार व्हाईट हाऊसमध्ये पाहायला मिळाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यात तणावपूर्ण बैठक पाहायला मिळाली. झेलेन्स्कीनंतर ट्रम्प यांनी पुन्हा एकदा रुद्रावतार दाखवत दक्षिण आफ्रिकेच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. आफ्रिकेतील वांशिक हिंसाचारावरील वादविवादात ट्रम्प यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले.

ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या शेतकऱ्यांवरील कथित हल्ल्यांचे व्हिडिओ पुरावे सादर केले आणि कठोर कारवाईची मागणी केली. रामाफोसा या आरोपामुळे अस्वस्थ दिसत होते आणि त्यांनी या विषयावर खाजगी चर्चा करण्याची विनंती केली. दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने ट्रम्प यांचे हे दावे खोटे आणि चिथावणीखोर असल्याचे म्हटले आहे. जमीन सुधारणा, वांशिक हिंसाचार आणि राजनैतिक मुत्सद्देगिरी या विषयांवरील आंतरराष्ट्रीय चर्चेचा हा खटला पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.

Donald Trump Vs Cyril Ramaphosa

ट्रम्प यांनी काय केले आरोप, काय दाखवले पुरावे!

"माझ्याकडे पुरावे आहेत," असे ट्रम्प म्हणाले आणि त्यांनी कथित हल्ल्यांचे अत्यंत संवेदनशील व्हिडिओ फुटेज सादर केले. यावर, राष्ट्रपती रामाफोसा यांनी व्हिडिओ थांबवण्याची विनंती केली आणि खाजगी चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्याची सूचना केली. ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीचे वर्णन रक्तपाताचे म्हणून केले आणि हत्याकांड दाखवणारे उपग्रह प्रतिमा देखील सादर केल्या. रामाफोसा यांनी शांतपणे उत्तर दिले, नेल्सन मंडेला यांच्या शिकवणींचा उल्लेख केला आणि संवाद आणि शांततेवर भर दिला.

SA राष्ट्राध्यक्ष रामाफोसा काय म्हणाले?

रामाफोसा म्हणाले की जर अफ्रीकानेर (Afrikaner) मधील शेतकऱ्यांवर नरसंहार झाला असता तर त्यांचे कृषी मंत्री बैठकीला उपस्थित राहिले नसते. त्यांनी ट्रम्प यांना दक्षिण आफ्रिकेतील लोकांचे म्हणणे ऐकण्याचे आवाहन केले, जेणेकरून खरी परिस्थिती त्यांना कळेल, कोणत्याही व्हिडिओतून किंवा लेखातून हा दावा करणे चुकीचे ठरेल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केले आरोप?

डोनाल्ड ट्रम्प यांनी गोऱ्या शेतकऱ्यांवरील हल्ल्यांचा दावा करणारे लेख आणि व्हिडिओ दाखवले. आरोप केला की अशा घटना मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये कव्हर केल्या जात नाहीत. दुसरीकडे, रामाफोसा यांनी स्पष्ट केले की हे विचार सरकारी धोरणाचा भाग नाहीत, तर काही लहान पक्षांचे विचार आहेत. त्यामुळे अशा घटनांना कधीही देशात थारा दिला जात नाही.

भूसंपादन व कायदा-सुव्यवस्थेवरही चर्चा

बैठकीत जमीन ताब्यात घेण्याचा मुद्दाही उपस्थित झाला. ट्रम्प यांनी असे व्हिडिओ दाखवले ज्यात काही लोक परवानगीशिवाय जमीन ताब्यात घेण्याबद्दल बोलत होते. यावर रामाफोसा म्हणाले की, गुन्हेगारी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि दक्षिण आफ्रिकेतील गुन्ह्यांचे बळी बहुतेक काळे लोक आहेत. येथे रंगवादाचा किंवा वंशवादाचा मुद्दाच येत नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+