ट्रम्पच्या टेरिफ बंदीचा या तिघांना सर्वाधिक फायदा; एका दिवसांत कमवले ८० अब्ज डाॅलर, नेमके काय झाले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हातात घेतल्यानंतर अनेक विवादास्पद निर्णय घेतले. या निर्णयाची चर्चा सुरु असताना जगभर मंदीचे संकट घोंगावू लागले. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली. बुधवारी ट्रम्प यांनी पुढील ९० दिवस आयात शुल्क स्थगितीचा निर्णय जाहीर केला. त्या निर्णयाचा फायदा जगातील ३ अब्जाधिशांना लगेचच झाला. या तिन्ही अब्जाधिशांनी एकाच दिवसांत ८० अब्ज डाॅलर कमवले.

शेअर बाजारात तेजी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ९० दिवस कर स्थगितीची घोषणा केली. त्यानंतर जगभरातील शेअर बाजारात अचानक तेजी आली. टेस्ला, अमेझाॅन, मेटा या सारख्या टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये टेस्लाच्या एलोन मस्क यांची संपत्ती एकाच दिवसांत ३५.९ अब्ज डाॅलरने वाढली. फेसबुकच्या मार्क झुकेरबर्ग यांनी एकाच दिवसांत २५.९ अब्ज डाॅलर तर जेफ बेझोसन यांनी १८.५ अब्ज डाॅलर्सची कमाई केली.
टेक स्टाॅकमध्ये तेजी
ट्रम्प यांनी दिलेल्या सवलतींचा सर्वात मोठा परिणाम टेक शेअर्सवर दिसला. मेटाच्या शेअर्समध्ये १५ टक्के तर अमेझाॅनच्य शेअर्समध्ये १२ टक्के वाढ झाली. दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे मार्क झुकेरबर्ग आणि जेफ बेझोस यांच्या संपत्तीतही मोठी वाढ झाली. मार्क झुकेरबर्ग यांनी १५.८ अब्ज डाॅलर्स कमावले. आता त्यांची संपत्ती २०७ अब्ज डाॅलर्स झाली आहे. जेफ बेझोस यांनी १८.५ अब्ज डाॅलर्सची कमाई केली. आता त्यांची संपत्ती २०० अब्ज डाॅलर्सच्या पुढे गेली आहे.












Click it and Unblock the Notifications