Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एक बिझनेस मॅन ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, असा आहे ट्रम्प यांचा प्रवास

Donald Trump : अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दररोज कोणत्या- ना कोणत्या मुद्द्यावरुन ते नेहमीच जगभरात चर्चेत असतात. ते जगातील सर्वात शक्तीशाली देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या या निर्णयाचे जगभरात पडसाद उमटतात. ट्रम्प हे अनेकदा त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत राहतात. त्यांचा एक बिझनेस मॅन ते राजकारणी प्रवास ही तितकाच रंजक आहे.

डोनाल्ड ट्रॅम्प राजकारणात येण्यापूर्वी रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रसिध्द बिझनेसम मॅन होते. त्याचा व्यवसाय अमेरिकेसह इतर देशांमध्ये पसरलेला आहे. त्यांचे वडीलही अमेरिकेतील रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठे बिझनेस मॅन होते. वयाच्या अवघ्या 13 व्या डोनाल्ड ट्रम्प यांना वर्षी शिस्त लागण्यासाठी लष्करी अकादमीत पाठवण्यात आलं होतं. वडिलांच्या निधनानंतर ट्रम्प यांनी प्रथम बिझनेस सांभाळला. ते एवढ्यावरच न थांबता त्यांनी आपला बिझनेस जगभरातील अनेक देशांमध्ये वाढवला आहे.

Donald Trump

डोनाल्ड ट्रम्प यांना वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता

न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालात म्हटलं आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या वडिलांकडून 413 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती वारसाहक्काने मिळाली आहे.

जगभरातील अनेक देशात ट्रम्प यांचे व्यवसाय

ट्रम्प यांनी एका मुलाखतीत म्हटलं होत की, कौटुंबिक व्यवसायात येण्यापूर्वी त्यांनी वडिलांकडून 1 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज घेऊन रिअल इस्टेट क्षेत्रात एंट्री केली. त्यानंतर कठोर मेहनतीनंतर त्यांना अमेरिकन रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी ओळख मिळाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वडिलांकडून रिअल इस्टेट क्षेत्राची बारकावे शिकून घेतले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांच्या प्रकल्पांवर काम केलं. तसेच न्यू यॉर्क शहरातील निवासी प्रकल्पांचा पोर्टफोलिओ व्यवस्थापित करण्यास सुरुवात केली. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांच्या बिझनेसची जबाबदारी आली.

अमेरिकेत ट्रम्प टॉवर हे खूप प्रसिद्ध आहे, जो डोनाल्ड ट्रम्पच्या रिअल इस्टेट व्यवसायाचा एक भाग आहे. ट्रॅम्प यांनी अमेरिकेसह जगभरातील इतर देश फिलीपिन्स, तुर्की आणि भारतापर्यंत आपला मालमत्ता व्यवसाय वाढवला. ट्रम्प टॉवर ऑर्गनायझेशनने गोल्फ कोर्स, हॉटेल्स आणि कॅसिनो बांधले आहेत.

एक व्यवासायिक असताना राजकारणावर केलं होतं भाष्य

एका रिपोर्टनुसार 1980 साली एका मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी राजकारणावर भाष्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की " राजकारण हे अत्यंत स्वार्थी जीवन" तसेच "सर्वात सक्षम लोक" राजकारणापेक्षा व्यवसायाला प्राधान्य देतात. त्यानंतर काही वर्षांनीच ट्र्रम्प यांनी 1987 ला त्यांनी राष्ट्राध्यक्षाच्या पदासाठी दावा करण्यास सुरुवात केली. ट्रम्प यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात रिफॉर्म पार्टीपासून केली. त्यानंतर 2012 मध्ये ते रिपब्लिकन उमेदवार म्हणून लोकांसमोर आले.

डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती

सध्या डोनाल्ड ट्रम्प यांची एकूण संपत्ती 8 अब्ज डॉलर आहे. फोर्ब्सच्या मते ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांची संपत्ती दुप्पट झाली. ते ऑक्टोबरच्या सुरुवातीला 4 बिलियन डॉलर पर्यंत होती. ती आता मंगळवारी 29 ऑक्टोबर ला 8 बिलियन डॉलर ऐवढी झाली आहे.

फोर्ब्स रिअल-टाइम ट्रॅकरनुसार 78 वर्षीय ट्रम्प आता जगातील 357 व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ट्रम्प यांच्या संपत्तीत ही वाढ निवडणुकीत त्यांची वाढती लोकप्रियता आणि त्यांची मीडिया कंपनी ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप (टीएमटीजी) च्या शेअर्समध्ये झालेली वाढ यामुळे झाली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+