BOOM... फक्त २५ सेकंदांत केले होत्याचे नव्हते; डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला दाखवली ताकद; पहा व्हिडीओ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची ताकद जगाला दाखवून दिली. इराण समर्थित हुथी बंडखोरांवर अमेरिकेचे हल्ले सुरूच ठेवले आहेत. आज डोनाल्ड ट्र्म्प यांनी हुथी बंडखोरांवरील हल्ल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओत एक अमेरिकन लढाऊ विमान हुथी बंडखोरांवर बॉम्ब टाकताना दिसत आहे. हुथी बंडखोर एका वर्तुळात उभे असलेले आहेत. त्यांना लक्ष्य केले जाते आणि त्यानंतर तिथे फक्त एक खड्डा दिसतो. या २५ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांचे हेतू काय आहेत हे स्पष्ट केले.

फक्त २५ सेकंदाचा व्हिडीओ
हा व्हिडिओ फक्त २५ सेकंदांचा आहे. ज्या विमानातून बाँम्ब टाकला, त्याच लढाऊ विमानातून तो रेकॉर्ड केलेला आहे. काही लोक जमिनीवर एका गोलाकार वर्तुळात उभे असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. बॉम्ब टाकण्यासाठी लढाऊ विमान या वर्तुळाच्या मध्यभागी एक लक्ष्य निश्चित करते. यानंतर काही सेकंदांनी बॉम्ब टाकला जातो. एक मोठा स्फोट होतो. धुराचे लोट पसरतात. काही सेकंदातच होत्याचे नव्हते होते आणि वर्तुळाकार उभे असलेले सर्व लोक मरतात. त्या ठिकाणी फक्त एक खोल खड्डा दिसतो. यावरून हा बॉम्ब किती शक्तिशाली होता याचा अंदाज लावता येतो.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
या व्हिडिओसोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लिहिले - हे हुथी हल्ला करण्यासाठी जमले होते. अरेरे, आता हे हुथी हल्ला करणार नाहीत!
ते पुन्हा कधीही आमची जहाजे बुडवणार नाहीत!
These Houthis gathered for instructions on an attack. Oops, there will be no attack by these Houthis!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) April 4, 2025
They will never sink our ships again! pic.twitter.com/lEzfyDgWP5
आत्तापर्यंत २२ हल्ले
उत्तर येमेनचा बराचसा भाग इराण समर्थित हुथी बंडखोरांच्या नियंत्रित आहे. २०१४ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सरकारशी ते लढत आहेत. अमेरिकन सैन्याने १५ मार्चपासून उत्तर येमेनमधील हुथींच्या ताब्यातील भागात हवाई हल्ले पुन्हा सुरू केले. या गटाला अमेरिकन नौदल आणि या प्रदेशातील आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांवर हल्ला करता येणार नाही. हुथी बंडखोरांविरुद्ध अमेरिकेचे हवाई हल्ले दीर्घकाळ सुरू राहतील, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. मंगळवारी हुथी गटाने सांगितले की अमेरिकन सैन्याने गेल्या काही तासांत येमेनच्या उत्तर साना आणि सादा प्रांतातील त्यांच्या तळांवर २२ हवाई हल्ले केले आहेत.












Click it and Unblock the Notifications