डोनाल्ड ट्रम्पचा एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न! 6 मुद्द्यात समजून घ्या रणनिती, काल थेट बोलले
Trump says India tariffs hit Russian economy hard Understand what is strategy : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आडमुठे धोरण राबवत जगाला त्रस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. टॅरीफ करामुळे जागतिक व्यापाराला फटका बसत असून भारतालाही याची मोठी झळ बसली आहे. सोमवारी ११ ऑगस्ट २०२५ रोजी व्हाईट हाऊस येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, अनेक देशांवर अमेरिकेने लादलेल्या शुल्कामुळे सुरू असलेल्या जागतिक दबावामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की रशियन तेल खरेदी करण्यासाठी भारतावर ५० टक्के कर लावल्याने रशियाच्या अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम झाला आहे.

भारतावर ५० टक्के शुल्क
डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात रशियन तेल खरेदीचे कारण देत भारताचे शुल्क ५० टक्के केले. ट्रम्प यांनी भारतावर दोन टप्प्यात ५० टक्के कर लादला, ३० जुलै रोजी पहिल्यांदा २५ टक्के कर जाहीर करण्यात आला आणि ७ ऑगस्ट रोजी अतिरिक्त २५ टक्के कर जाहीर करण्यात आला. ही रणनिती काय आहे आणि ट्रम्प यांना एकाच दगडात कसे दोन पक्षी मारायचे आहेत हे जाणून घेऊया.
डोनाल्ड ट्रम्प यांची रणनिती काय?
- डोनाल्ड ट्रम्प यांना आशियायी देशाचे वाढते जागतिक महत्व कमी करायचे आहे. हे दोन आशियायी देश म्हणजे भारत आणि चीन आहेत.
- रशियाशी चीन आणि भारताची मैत्री आहे, टॅरीफचा धाक दाखवून त्यांना ही मैत्रीची साखळी तोडायची आहे.
- भारत आणि चीन या दोन अर्थव्यवस्था पहिल्या चारमध्ये आहे त्यांना खिळखिळे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
- भारत आणि रशियाची मैत्री ट्रम्प यांना खुपतेय, कारण या मैत्रीमुळे मोठे व्यापारी करार होत आहेत, आणि याचा दोन्ही देशांना फायदा होत आहे, हे अर्थव्यवस्थेसाठी पोषक आहे आणि ट्रम्प यांना हेच नको आहे.
- अमेरिकेचे जागतिक अर्थव्यवस्थेतील आणि व्यापारातील स्थान अबाधित ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
- अमेरिकेचा सर्वात शक्तिशाली स्पर्धक रशिया आहे आणि भारत आणि चीनसारख्या बलाढ्य आणि व्यापारी दृष्टीने सर्वात महत्वाच्या असलेल्या राष्ट्रांशी असलेली रशियाची व्यापार आणि मैत्रीची नाळ तोडायची आहे. त्यातून रशियाची शक्ती कमी करण्याचा प्रयत्न आहे.
ट्रम्प यांचा एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न काय आहे?
१. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादून रशियाशी असलेला व्यापारात बाधा आणायची आहे, रशियाला तेल निर्यातीतून आणि इतर व्यापारविषयक बाबीतून भारताकडून मिळणार नफाही त्यांना नकोसा आहे. कारण तज्ज्ञही सांगतात की,यामुळे रशिया शक्तिशाली बनत असून त्यांना रशियाला आर्थिक, लष्करी आणि राजकीय दृष्टीने कमकुवत करणे हे एक धोरण आहे.
२. भारत जागतिक अर्थव्यवस्थेत चौथ्या स्थानी पोहचला आहे, २०३० पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू शकते. फ्रान्सला मागे टाकण्याच्या तयारीत भारत आहे आणि आयएमएफनेही हे म्हटले आहे. त्यामुळे भारतासारखी महाशक्ती उदयास येणे अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरू शकते. भारत आणि रशिया तसंच चीन जर एकत्र असतील तर अमेरिकेची पिछेहाट होईल आणि अमेरिकेपेक्षा मोठी शक्ती जगात स्थापित होईल हे अमेरिकेला नको आहे. म्हणून एकाच दगडात टॅरीफ आणि इतर कुरापतीद्वारे दोन पक्षी मारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
११ ऑगस्टला रशियाबद्दल काय म्हणाले ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी व्हाईट हाऊस येथे पत्रकार परिषदेत "रशियाची अर्थव्यवस्था चांगली चालत नाही, "रशियाला त्यांचा देश बांधण्यासाठी पुन्हा सुरुवात करावी लागेल" असे म्हटले. ट्रम्पने पुढे असे सुचवले की रशियन अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत नाही कारण ती टॅरिफमुळे "खूपच विस्कळीत" झाली आहे.












Click it and Unblock the Notifications