जग हादरले! भारताच्या 'या'वर २०० टक्के टॅरिफ लावण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प, धक्कादायक बाब समोर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संभाव्य धोरणांमुळे जागतिक बाजारपेठ हादरली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "महान नेते" आणि "मित्र" असे संबोधूनही ट्रम्प यांनी भारताच्या बहुतांश वस्तूंवर ५०% टॅरिफ लागू केला होता, ज्यामुळे अनेक भारतीय व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. आता समोर आलेल्या एका धक्कादायक माहितीनुसार, ट्रम्प प्रशासन भारतीय औषधे आणि गोळ्यांवर तब्बल २००% टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहे.

औषधांवरील २००% टॅरिफची ट्रम्प यांची योजना
सध्या तरी ट्रम्प यांनी भारतीय औषधांवर ५०% टॅरिफ लागू केलेला नाही. यामागे त्यांची एक मोठी आणि धक्कादायक योजना असल्याचे समोर आले आहे. अहवालानुसार, ट्रम्प यांना भारतीय औषधांवर थेट २००% टॅरिफ लावायचा आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे जगातील सर्वात मोठा जेनेरिक औषधांचा निर्यातदार असलेल्या भारतासाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. जर अमेरिकेने इतका मोठा टॅरिफ लावला, तर भारतीय औषध उत्पादकांना मोठा तोटा होईल आणि याचा थेट परिणाम भारताच्या औषध निर्यातीवर होईल.
चीनला लक्ष्य करताना भारताला फटका?
काही अहवालांनुसार, ट्रम्प प्रशासन प्रामुख्याने चीनमधून आयात होणाऱ्या औषधांवर आणि त्यांच्या कच्च्या मालावर (API) लक्ष केंद्रित करत आहे. चीन हा औषध उद्योगासाठी कच्चा माल पुरवणारा एक प्रमुख देश आहे. जर चीनमधून होणाऱ्या आयातीवर निर्बंध आले, तर त्याचा परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर होईल आणि पर्यायाने भारतालाही याचा फटका बसू शकतो. जर भारतीय औषधांवर २००% टॅरिफ लागू झाला, तर मिळणारा नफा कमी झाल्यामुळे भारतीय कंपन्यांसाठी अमेरिकेला निर्यात करणे आर्थिकदृष्ट्या अवघड होईल. २००% टॅरिफ हा भारतासाठी एक मोठा अन्याय ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
रशिया-युक्रेन युद्ध आणि अमेरिकेचा दबाव
अमेरिकेने भारतावर हा दबाव आणण्यामागे भारताचे रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे हे एक प्रमुख कारण आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतरही भारताने रशियाकडून तेल आयात सुरू ठेवली आहे, ज्यामुळे अमेरिकेला मोठी चिंता वाटत आहे. अमेरिकेच्या मते, भारताच्या या धोरणामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळते. ट्रम्प प्रशासनाने भारतावर ५०% टॅरिफ लावून भारताला रशियावर दबाव टाकण्यासाठी इशारा दिला आहे.
त्यामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचा दौरा पूर्ण केल्यानंतर लगेचच चीनचा दौरा केला, यावेळी ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत एकाच गाडीतून बैठकीसाठी गेले. या घटनेमुळे भारत, रशिया आणि चीन अमेरिकेच्या विरोधात एकत्र येत असल्याचा संदेश जागतिक राजकारणात गेला आहे. ट्रम्प यांच्या या नव्या टॅरिफच्या धमकीने भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिकच ताणले गेले आहेत. या सर्व घडामोडी जागतिक व्यापाराचे आणि राजकारणाचे समीकरण बदलत आहेत.












Click it and Unblock the Notifications