Ukraine Russia Conflict: ट्रम्प यांची पुतिन यांच्याशी फोनवर बातचित, युक्रेन युद्ध वाढवू नका: रिपोर्ट
Ukraine Russia Conflict: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर बोलून युक्रेनमधील युद्ध वाढवू नये, असे आवाहन केले आहे. ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील मार-ए-लागो इस्टेटमधून हा कॉल करण्यात आला होता.
ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन संघर्ष संपुष्टात आणण्याच्या मुद्द्यावर भर दिला आहे. तसेच या समस्येचे निराकरण करण्यासाठी आपण रशियाशी पुढील चर्चा करण्यासाठी सहभाग घेऊ, असं त्यांनी सांगितले आहे.

कॉल दरम्यान ट्रम्प यांनी पुतीन यांना युरोपमधील अमेरिकन सैन्य उपस्थितीची आठवण करून दिली. युक्रेनमधील संघर्ष थांबवण्याच्या प्रयत्नांवर चर्चा करण्यासाठी पुढाकार घेऊ असल्याचं त्यांनी सांगितले आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार ट्रम्प म्हणाले की, युक्रेनमधील युद्ध संपवण्याची तीव्र गरज आहे आणि भविष्यात रशियाशी चर्चा सुरू ठेवायची आहे.
झेलेन्स्की यांच्याशीही फोनवर चर्चा
ट्रम्प यांनी यापूर्वी 6 नोव्हेंबर रोजी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यावेळी एलोन मस्क देखील उपस्थितीत होते. झेलेन्स्की यांनी चर्चा "उत्कृष्ट" म्हणून त्याचं वर्णन केलं होतं. तसेच आगामी यूएस प्रशासनासह सतत सहकार्याची आशा व्यक्त केली होती.
रशिया-युक्रेन युद्धाची सद्यस्थिती
रशिया-युक्रेन युद्ध आता अडीच वर्षांहून अधिक काळ झाला सुरू आहे. जागतिक राजकारणातील एक महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. अलिकडच्या काही महिन्यांत दोन्ही देशांनी निर्णायक आघाडी मिळवण्यासाठी मोठी पावले उचलली होती. या आठवड्याच्या शेवटी दोन्ही बाजूंनी आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ले करण्यात आले. झेलेन्स्कीच्या म्हणण्यानुसार रशियाने युक्रेनवर 145 ड्रोन हल्ले करण्यात आली आहेत, तर रशियाने 34 युक्रेनियन ड्रोन पाडल्याचा दावा केला होता.
ट्रम्प यांच्या निवडणुकीचा परिणाम
डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे युक्रेन युद्ध संपण्याच्या दिशेने एक नवीन शक्यता म्हणून पाहिले जात आहे. त्यांनी संघर्ष लवकर संपवण्याबाबत आणि कीवला अमेरिकेकडून देण्यात येणारी आर्थिक मदत यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचवेळी ट्रंप यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी युक्रेनला जास्तीत जास्त पाठिंबा देण्यावर विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांचे प्रशासन भर देत आहे. व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी रविवारी युक्रेनसाठी बायडेन प्रशासनाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि म्हटले की, युक्रेनला युद्धात मजबूत स्थितीत ठेवायचे आहे.












Click it and Unblock the Notifications