Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारतीयांना आयफोन महागणार?, Donald Trump यांनी दिला दणका, Apple कंपनीच्या मालकाला दिला 'हा' इशारा

Donald Trump on India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच भारताबद्दल एक मोठा दावा केला आहे. ट्रम्प म्हणाले की, भारताने अमेरिकेला शून्य शुल्क व्यापार कराराची ऑफर दिली आहे. या दाव्यानंतर एकंदरीतच ट्रम्प यांनी आता भारताच्या व्यापारावर वक्रदृष्टी टाकण्यास सुरूवात केल्याचे बोलले जात आहे.

त्याचे कारण असे आहे की, त्यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना भारतात आयफोन बनवू नये अशी विनंती करून भारतातातील आयफोन निर्मितीवर निर्बंध आणण्यास सुरूवात केली आहे.

भारतात अॅपल मोठ्या प्रमाणात आयफोन निर्मितीसाठी काम करत आहे. पुढील वर्षभरात मोठ्या प्लॅन देखील तयार झालेला आहे. अशातच ट्रम्प यांनी त्यात काडी करून आयफोन निर्मितीवर निर्बंध लादण्याचा डाव आखला आहे.

Donald Trump on Apple CEO Tim Cook

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या कतारच्या दौऱ्यावर आहेत. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांच्याशी भारतातील प्लांटबद्दल चर्चा केली. ते म्हणाले की, मला टिम कुकसोबत एक छोटीशी समस्या आहे. त्यांना भारतात आयफोन बनवायचे आहेत आणि मला ते नको आहे. Apple ने त्यांचे फोन फक्त अमेरिकेत बनवावेत. भारतात कोणतीही वस्तू विकणे ही गोष्ट खूप अवघड आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Take a Poll

अ‍ॅपल चीनपासून अंतर वाढवतोय

अॅपल चीनमध्ये मोठ्या प्रमाणात आयफोन बनवत होते, पण आता ते चीनपासून स्वतःला दूर ठेवू पाहत आहे. कोविड-19 दरम्यान अॅपलला सर्वात मोठा धक्का बसला. त्याचे फोन काम करणे बंद झाले होते. यानंतर ट्रम्प यांनी चीनवर मोठे शुल्क लादले.

प्रत्युत्तर म्हणून चीननेही त्यावर शुल्क लादले. अ‍ॅपल टॅरिफ वॉरमध्ये अडकले आणि त्यांनी चीन सोडण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत, तो आता भारतीय भूमी शोधत आहे, परंतु आता यावरही धोका निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. कारण, डोनाल्ड ट्रम्प यांनी एका प्रकारे एपल कंपनीच्या सीईओंना ताकीदच दिली आहे.

भारतासाठी अॅपलची काय होती योजना?

जर अॅपलने आपले असेंब्ली युनिट भारतात हलवले तर 2026 पासून दरवर्षी येथे 6 कोटींहून अधिक आयफोन तयार होतील. हे सध्याच्या क्षमतेपेक्षा दुप्पट असेल. सध्या आयफोनच्या उत्पादनात चीनचे वर्चस्व आहे. आयडीसीच्या मते, 2024 मध्ये कंपनीच्या जागतिक आयफोन शिपमेंटपैकी 28 टक्के येथून येतील.

ट्रम्पने अ‍ॅपलच्या सीईओंना काय म्हटले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना सांगितले आहे की, भारतात कारखाने उभारण्याची गरज नाही. मला तिथे अॅपलची उत्पादने बनवायची नाहीत. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो. भारत देश त्यांचे ते बघतील. गुरुवारी कतारची राजधानी दोहा येथे व्यावसायिक नेत्यांसोबत झालेल्या कार्यक्रमादरम्यान ट्रम्प यांनी अ‍ॅपलच्या सीईओंसोबतच्या या संभाषणाची माहिती दिली. त्यामुळे आता अॅपलला अमेरिकेत उत्पादन वाढवावे लागेल.

अमेरिकेत विकले जाणारे 50% आयफोन भारतात बनतात

अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अमेरिकेच्या बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या 50 % आयफोन भारतात तयार केले जात आहेत.

एप्रिल-जून तिमाहीत अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोनसाठी भारत हा मूळ देश बनेल, असे कुक म्हणाले होते. त्यांनी सांगितले की एअरपॉड्स, अ‍ॅपल वॉच सारखी इतर उत्पादने देखील बहुतेक व्हिएतनाममध्ये तयार केली जात आहेत.

भारतीयांसाठी आयफोन महागणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एपल कंपनीचे सीईओ टीम कूक यांना जर आयफोन अमेरिकेतच निर्माण करण्यास सांगितले. तर भविष्यात टीम कुक यांना तसा निर्णय घ्यावा देखील लागू शकतो, अन्यथा कंपनीला मोठ्या त्रासाला देखील सामोरे जावे लागेल. जर एपल कंपनीने त्यांचे उत्पादन अमेरिकेत सुरू केले आणि भारतातील निर्मिती प्लॅंट बंद केले तर आगामी काळात भारतीयांसाठी आयफोन महागणार यात कोणतेही दुमत नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+