Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ट्रम्प यांचा मोठा निर्णय, आयात केलेल्या गाड्यांवर 25 टक्के कर, भारतीय कार उत्पादकांच्या अडचणी वाढणार

Imported cars 25 percent: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशातून आयात केलेल्या गाड्यांवर 25 टक्के कर लादला आहे. बुधवारी रात्री ट्रम्प यांनी यासंबंधीच्या आदेशावर स्वाक्षरीही केली आहे. ट्रम्प यांनी परदेशी कारच्या आयातीवर 25 टक्के आयात शुल्क लादून कार निर्यातदारांना मोठा धक्का दिला आहे.

ट्रम्प यांनी वाहन आयातीवर जाहीर केलेल्या 25% करमुळे अमेरिकेला दरवर्षी 100 अब्ज डॉलर्सचे कमाई होण्याची अपेक्षा आहे. शुल्क जाहीर करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, यामुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल. अमेरिकन ट्रम्प सरकारने लादलेल्या 25% टॅरिफचा परदेशी कारच्या आयातीवर काय परिणाम होईल ते जाणून घेऊया?

Donald Trump

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या टॅरिफची घोषणा करताना म्हणाले की, अमेरिकेत उत्पादित न होणाऱ्या सर्व गाड्यांवर 25 टक्के टॅरिफ लावला जाईल. यामुळे अमेरिकेच्या ऑटोमोबाईल उद्योगात वाढ होईल. अमेरिकेत उत्पादित होणाऱ्या गाड्यांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यामुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल ,असा दावा ट्रम्प यांनी केला. परंतु तज्ञांचा असा विश्वास आहे की, यामुळे ऑटोमोबाईल कंपन्यांवर, विशेषतः ज्या कंपन्या जागतिक पुरवठा साखळीवर अवलंबून आहेत, त्यांच्यावर आर्थिक दबाव येऊ शकतो.

ट्रम्प प्रशासनाने 3 एप्रिलपासून लागू केलेल्या या शुल्काचा उद्देश ऑटो उत्पादकांना अमेरिकेत कारखाने उभारण्यास प्रोत्साहित करणे आहे, ज्यामुळे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमधील व्यापक पुरवठा साखळी तोडली जाईल.

टॅरिफ वाढीचा कारच्या किमतींवर कसा परिणाम होईल?

ट्रॅम्प यांनी 25 टक्के आयात शुल्क लादल्यामुळे कारच्या किमतीत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे, आयात केलेल्या वाहनांची किंमत $12,500 अतिरिक्त असण्याची शक्यता आहे. नवीन कारची सरासरी किंमत सुमारे $49,000 आहे हे लक्षात घेता. ज्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना कार खरेदी करणे कठीण होईल.

Take a Poll

वाहन शुल्काचा भारतीय वाहन क्षेत्रावर होणार मोठा परिणाम

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या ऑटो टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील ऑटो पार्ट्स उद्योगावर परिणाम होऊ शकतो. मदरसन ग्रुप, सनसेरा इंजिनिअरिंग लिमिटेड , सुप्रजित इंजिनिअरिंग लिमिटेड, टाटा मोटर्स आणि आयशर मोटर्स सारख्या भारतीय ऑटो पार्ट्स उत्पादकांसाठी अमेरिका ही एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. त्यामुळे मोठ्या भारतीय कंपन्यांनाही याचा फटका बसू शकतो. कारण या कंपन्या अमेरिकेत ऑटोमोबाईल्स, मोटारसायकली आणि ट्रक निर्यात करतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+