पैसा फेका अन् अमेरिकेचे नागरिकत्व मिळवा! श्रीमंतांसाठी ट्रम्प यांची ऑफर, वाचा काय आहे गोल्डन कार्ड?
Donald Trump Gold Card : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या देशात बेकायदेशीर स्थलांतरांना बाहेर हाकलून दिले अन् देत आहेत, यात अनेक भारतीयांचाही समावेश आहे, तर दुसरीकडे पैसा द्या अन् अमेरिकेचे नागरिकत्व मिळवा असा अजब फंडा सुरु केला आहे. त्यासाठी त्यांनी गोल्डन कार्ड आणले आहे. याद्वारे अमेरिकेत ते जगातील श्रीमंतांना नागरिकता देणार आहे, त्यासाठी विशिष्ट रक्कम आकरणार आहेत.
जगातील श्रीमंतांसाठी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खास योजना आणली आहे. या योजनेनुसार, जर तुम्हाला अमेरिकेत स्थायिक व्हायचे असेल, तर तुम्हाला ठराविक रक्कम भरून अमेरिका गोल्ड कार्ड मिळू शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील श्रीमंत लोकांना अमेरिकेत स्थायिक करण्याची योजना आणली आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. खरं तर, मंगळवारी (25 फेब्रुवारी) डोनाल्ड ट्रम्प यांनी गोल्ड कार्डची घोषणा केली, ही ग्रीन कार्डची प्रीमियम आवृत्ती मानली जात आहे.

काय आहे उद्देश
गोल्डन कार्ड योजनेद्वारे ट्रम्प अमेरिकेची तिजोरी भरण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेत यानिमित्ताने श्रीमंतांची संख्याही जास्तपटीने वाढणार आहे. या दोन्हीतून अमेरिकेला आणखीनच समृद्ध आणि शक्तिशाली करण्याचा ट्रम्प यांचा हेतू दिसतो.
काय म्हणाले ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'आम्ही गोल्ड कार्ड विकणार आहोत. ग्रीन कार्डपेक्षा हे चांगले कार्ड आहे. आम्ही या कार्डची किंमत 5 दशलक्ष डॉलर्स (43 कोटी 56 लाख 48 हजार रुपये) ठेवू आणि ते तुम्हाला ग्रीन कार्ड तसेच इतर अनेक सुविधा देईल.
नेमकी काय आहे 'गोल्ड कार्ड' योजना
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील श्रीमंतांना सेटल करण्याची योजना आणली आहे. या योजनेला गोल्ड कार्ड योजना असे नाव देण्यात आले आहे. याद्वारे लोकांना 5 दशलक्ष डॉलर्स देऊन अमेरिकन नागरिकत्व मिळेल. या नागरिकत्वासोबतच अनेक प्रकारच्या विशेष सुविधाही देण्यात येणार आहेत.
अमेरिकेला या योजनेचा कसा फायदा होईल?
गोल्ड कार्ड योजनेद्वारे फक्त श्रीमंत लोकच तिथले नागरिकत्व घेऊ शकतात. कारण गरीब लोक एवढी मोठी रक्कम देऊ शकत नाहीत. नागरिकत्वासाठी इतके पैसे देऊ शकणाऱ्या व्यक्तीचा साहजिकच मोठा व्यवसाय आहे. त्याच्याकडे खूप पैसा असेल. ते अमेरिकेत खूप पैसा खर्च करतील ज्यामुळे तेथील लोकांना रोजगार मिळेल. आणि अमेरिकन सरकारला भरपूर कर देखील भरतील. त्यामुळे तिथली अर्थव्यवस्था मजबूत होईल. हे लक्षात घेऊन ट्रम्प यांनी ही योजना सुरू केली आहे.












Click it and Unblock the Notifications