Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याचा ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांवर काय परिणाम होणार? वाचा

Donald Trump decides to end birthright citizenship : डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी 2025 रोजी युनायटेड स्टेट्सचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. यानंतर त्यांनी काही निर्णयांचा झपाटाच लावला. धडाधड् निर्णय घेत त्यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष म्हणून आपला मनसुबा स्पष्ट केला. दरम्यान, काही तासांनंतर त्यांनी युनायटेड स्टेट्समध्ये जन्मलेल्या स्थलांतरित मुलांसाठी जन्म हक्क नागरिकत्व (स्वयंचलित नागरिकत्व) समाप्त करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी 20 जानेवारी 2025 रोजी रात्री दहा वाजता युनायटेड स्टेट्सचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. एका खास समारंभात जगातील जवळपास सातशे महत्वपूर्ण पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. शपथविधीनंतर त्यांनी काही तासांनंतर एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. ही स्वाक्षरी जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्यासाठीचा हा निर्णय होता.

Donald Trump decides to end birthright citizenship

अमेरिकेत जन्मलेल्या स्थलांतरित मुलांचे जन्मसिद्ध नागरिकत्व काढून टाकण्याचा प्रस्ताव आहे. हे पाऊल एक शतकाहून अधिक काळ लागू असलेल्या आणि अमेरिकेत जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला नागरिकत्व प्रदान करणाऱ्या यूएस राज्यघटनेच्या 14व्या दुरुस्तीच्या विरोधात विचार केला जात आहे.

जन्मसिद्ध नागरिकत्व म्हणजे काय?

14 व्या दुरुस्ती अंतर्गत, युनायटेड स्टेट्समध्ये जन्मलेल्या प्रत्येकाला त्यांच्या पालकांच्या स्थलांतराकडे दुर्लक्ष करून आपोआप नागरिकत्व मिळते. (त्याच्या अधिकारक्षेत्राच्या अधीन) या शब्दांचा अर्थ युनायटेड स्टेट्सच्या भूमीवर जन्मलेल्या सर्व व्यक्तींचा समावेश करण्यासाठी केला जातो, ज्यांचे पालक परदेशी मुत्सद्दी किंवा परदेशी लष्करी दलांचे सदस्य आहेत. ट्रम्प यांच्या आदेशाने या व्याख्येला आव्हान दिले आहे आणि म्हटले आहे की हा नियम अनधिकृत स्थलांतरित किंवा तात्पुरता व्हिसा धारकांच्या मुलांना लागू होणार नाही.

जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांची भूमिका

  • ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे संविधानाचा दुरुपयोग होणार नाही याची खात्री होईल.
  • या धोरणामुळे बेकायदेशीर स्थलांतरितांना अमेरिकेच्या संसाधनांचा गैरवापर करण्यापासून रोखता येणार.
  • 14 व्या दुरुस्तीचा हेतू बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुलांना खोटे नागरिकत्व देण्यासाठी वापरला जात आहे हा गैरवापर टळेल.

ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारतीयांवर परिणाम काय होणार?

H-1B व्हिसाधारकांसारख्या तात्पुरत्या व्हिसावर अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांच्या मुलांवर या आदेशाचा प्रामुख्याने परिणाम होऊ शकतो. अशा व्हिसाधारकांची मुले जर अमेरिकेत जन्माला आली तर त्यांना नागरिकत्व मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. हा आदेश सध्याच्या प्रकरणांवर परिणाम करणार नाही, परंतु अंमलबजावणीच्या 30 दिवसांनंतर लागू होईल.

निर्णयाविरुद्ध संघटनांचा कोर्टात दावा

अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन (ACLU) आणि इतर अधिकार संघटनांनी या आदेशाविरुद्ध फेडरल कोर्टात दावा दाखल केला. या आदेशानंतर अमेरिकेत राजकीय आणि कायदेशीर वाद आणखी तीव्र होऊ शकतो. ट्रम्प यांचा निर्णय राज्यघटनेच्या विरोधात आणि नागरी हक्कांचे उल्लंघन आहे असेही म्हटले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+