'मी तीन कटांचा बळी ठरलो': संयुक्त राष्ट्राच्या सभेत झालेल्या 'अपघातां'वरुन ट्रम्प यांचा गंभीर आरोप!
Donald Trump conspiracy claims on UN : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) महासभेत त्यांच्यासोबत झालेल्या तीन 'दुर्घटना' किंवा 'अपघातांना' 'षड्यंत्र' ठरवत या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे.
ट्रम्प यांनी आरोप केला आहे की, या घटनांच्या मागे मोठा कट असू शकतो आणि त्यात अमेरिकन गुप्त सेवा (Secret Service) देखील सहभागी असेल.
मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत या तीन संशयास्पद घटना घडल्याचे ट्रम्प यांनी बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल' वर सांगितले. त्यांनी लिहिले, "संयुक्त राष्ट्रांना स्वतःची लाज वाटली पाहिजे. काल, संयुक्त राष्ट्रांमध्ये फक्त एक, दोन नाही तर तीन अत्यंत संशयास्पद घटना घडल्या."

संयुक्त राष्ट्रांमध्ये ट्रम्पसोबत घडलेल्या तीन घटना कोणत्या?
१. एस्केलेटर अचानक थांबणे (पहिला अपघात)
घडलेली घटना: मुख्य मजल्याकडे जाणारा एस्केलेटर अचानक बंद पडला.
ट्रम्प यांचा आरोप: ट्रम्प म्हणाले की, जर त्यांनी आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांनी एस्केलेटरचे हँडल धरले नसते, तर मोठा अपघात घडू शकला असता. त्यांनी या घटनेला कट रचला गेला असे म्हटले असून, जबाबदार लोकांना अटक करण्याची मागणी केली आहे.
२. टेलिप्रॉम्प्टरमध्ये बिघाड (दुसरी घटना)
घडलेली घटना: ट्रम्प यांनी ८० व्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत (UNGA) आपले भाषण सुरू केले, तेव्हा त्यांच्या टेलिप्रॉम्प्टरमध्ये बिघाड झाला आणि तो काम करत नव्हता.
ट्रम्प यांची प्रतिक्रिया: "एस्केलेटरनंतर, आता टेलिप्रॉम्प्टर देखील बिघडला आहे. ही कसली जागा आहे?" असे त्यांनी म्हटले. मात्र, टेलिप्रॉम्प्टरशिवायच त्यांनी तब्बल ५७ मिनिटांचे भाषण दिले.
३. साउंड सिस्टम बंद (तिसरी घटना)
घडलेली घटना: ट्रम्प यांचे भाषण संपल्यानंतर, असेंब्ली हॉलमधील साउंड सिस्टम बंद झाली. परिणाम: यामुळे इतर जागतिक नेत्यांना ट्रम्प यांना ऐकण्यासाठी त्यांच्या भाषांतरकाराच्या इअरपीसवर अवलंबून राहावे लागले. ट्रम्प यांनी सांगितले की, भाषणानंतर मेलानिया म्हणाल्या, "मला एकही शब्द ऐकू आला नाही."
ट्रम्प यांची तातडीच्या चौकशीची मागणी!
ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या या 'संशयास्पद' घटनांवर गंभीर आक्षेप घेत संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना पत्र लिहिले आहे. त्यांनी तात्काळ चौकशीची मागणी केली आहे.
चौकशीसाठी पुरावा म्हणून त्यांनी सर्व एस्केलेटर सुरक्षा कॅमेरे आणि आपत्कालीन स्टॉप बटणावरील रेकॉर्डिंग जतन करण्याची मागणी केली आहे, कारण त्यांच्या मते या चौकशीत अमेरिकन गुप्त सेवा देखील सहभागी असेल.
२०१८ मध्ये ट्रम्प यांच्यावर हसले होते जागतीक नेते!
या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, ट्रम्प यांच्या संयुक्त राष्ट्रांमधील एका जुन्या घटनेची आठवण ताजी झाली आहे. २५ सप्टेंबर २०१८ रोजी UNGA मध्ये भाषण करताना, ट्रम्प यांनी असा दावा केला होता की, "दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत त्यांनी इतर सर्व अमेरिकन राष्ट्रपतींपेक्षा जास्त कामगिरी केली आहे." हा दावा ऐकून सभेत उपस्थित असलेल्या जागतिक नेत्यांनी हशा पिकवला होता. ट्रम्प यांनी त्यावेळी म्हटले होते, "मला ही प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. ठीक आहे."
-
अशोक खरातचा 'खेळ' खल्लास? एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर! -
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार?







Click it and Unblock the Notifications