Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

परदेशी वाहन आयातीवर 25 टक्के कर, ट्रम्प यांच्या निर्णयामुळे 5 भारतीय कंपन्यांना बसणार सर्वाधिक फटका

US President Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी वाहन आयातीवर 25 टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे. आता अमेरिकेत येणाऱ्या कार आणि कारच्या सुटे भागांवर 25 टक्के कर आकारला जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, नवीन टॅरिफ 2 एप्रिल 2025 पासून लागू होईल. कारच्या सुटे भागांवरील हा टॅरिफ मे किंवा त्यानंतर सुरू होईल.

ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, त्यांच्या या निर्णयामुळे कार उद्योगात वाढ होईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या 25% ऑटो टॅरिफचा फटका टाटा मोटर्स,आयशर मोटर्स, सोना बीएलडब्ल्यू आणि मदरसन यांसारख्या प्रमुख भारतीय कंपन्यांना बसणार आहे. 25% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील टाटा मोटर्स आणि टेस्ला आणि इतरांना पुरवठा करणाऱ्या देशातील ऑटो पार्ट्स उत्पादक कंपन्यांचे शेअर्स देखील घसरले आहेत.

US President Donald Trump

जग्वार लँड रोव्हरला सर्वाधिक फटका बसेल!

मनीकंट्रोलने वृत्त दिले आहे की, या कंपन्या युरोप, जपान, दक्षिण कोरिया आणि चीनला ऑटो कंपोनेंट निर्यात करतात, जे अमेरिकेला वाहने पुरवतात. टाटा मोटर्स थेट अमेरिकेत निर्यात करत नाही. पण तिची उपकंपनी जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) ची अमेरिकन बाजारपेठेत मजबूत पकड आहे.

जेएलआरच्या आर्थिक वर्ष 24 च्या वार्षिक अहवालानुसार अमेरिकेचा वाटा त्याच्या एकूण विक्रीत २२ टक्के होता. अहवालात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 24 मध्ये JLR ने जगभरात सुमारे 4,00,000 वाहने विकली, ज्यामध्ये अमेरिका त्यांच्या प्रमुख बाजारपेठांपैकी एक होती. कंपनीची अमेरिकेत विकली जाणारी वाहने प्रामुख्याने यूके आणि इतर आंतरराष्ट्रीय प्लांटमध्ये उत्पादित केली जातात, ज्यावर आता 25 टक्के शुल्क आकारले जाईल.

आयशर मोटर्सवरही परिणाम होईल!

दरम्यान,रॉयल एनफील्ड मोटरसायकल निर्माता आयशर मोटर्सवरही परिणाम होऊ शकतो कारण अमेरिका त्यांच्या 650 सीसी मॉडेलसाठी एक प्रमुख बाजारपेठ आहे. भारतातील आघाडीच्या ऑटो कंपोनंट उत्पादकांपैकी एक म्हणून मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडची युरोप आणि अमेरिका दोन्ही ठिकाणी मजबूत पकड आहे.

टेस्ला आणि फोर्डसह प्रमुख अमेरिकन वाहन उत्पादकांना सुटे भाग पुरवते. तसेच अहवालात असे नमूद केले आहे की, अमेरिका आणि युरोपमध्ये स्थापन झालेल्या उत्पादन युनिट्समुळे कंपनी आयात शुल्काच्या प्रभावापासून तुलनेने सुरक्षित आहे तर केवळ निर्यातीवर अवलंबून असलेल्या कंपन्या सुरक्षित नाहीत. सोना कॉमस्टार ऑटोमोटिव्ह सिस्टीम आणि घटकांचे उत्पादन करते, ज्यामध्ये डिफरेंशियल गिअर्स आणि स्टार्टर मोटर्सचा समावेश आहे. कंपनीला तिच्या उत्पन्नापैकी सुमारे 66 टक्के उत्पन्न अमेरिका आणि युरोपीय बाजारपेठेतून मिळते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+