जगभरातील आघाडीच्या वृत्तपत्रांत भारताच्या लोकसभा निवडणुकीची चर्चा
नवी दिल्ली: देशाची लोकसभा निवडणूक नुकतीच संपन्न झाली. एकक्षित पोलचे अंदाज देखील जाहीर झाले. अनेक संस्थानी भाजपला विक्रमी बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. जगभरातील आघाडीच्या वृत्तपत्रांत भारताच्या निकालाची चर्चा दिसून येत आहे.

"वॉशिंग्टन पोस्ट" ही अमेरिकेतील आघाडीचे दैनिक मानले जाते. या वृत्तपत्रात भारताच्या निवडणुकीची बातमी देताना, "जगातील सर्वात मोठा लोकशाही उत्सव, भाजपला वर्चस्वाची आशा" (THE WASHINGTON POST - World's largest democratic event.. BJP is still expected to dominate ) असा मथळा वापरण्यात आला आहे. सध्या अमेरिकेत सुद्धा अध्यक्षीय निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अमेरिकेत भारताच्या निवडणुकीबद्दल मोठी चर्चा असते.
जपान हा देश भारताचे मित्रराष्ट्र मानले जाते. आणि "द जपान टाइम्स" हे जपानमधील आघाडीचे दैनिक आहे. भारताच्या लोकसभा निवडणूक निकालाची चर्चा करताना या वृत्तपत्राने, "विक्रमी बहुमतासाठी मोदी सज्ज, एक्झिट पोलचा अंदाज" (Modi set for landslide election win in India, exit polls show) असा मथळा वापरण्यात आला आहे.
अल जझीरा हा देखील माध्यम समूहातील मोठा ब्रॅंड मानला जातो. डाव्या विचारसरणीच्या या माध्यम समूहाने भारताच्या निकालांची चांगलीच दखल घेतली आहे. "एक्झिट पोलमध्ये मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडीला बहुमत" ( India's Exit Polls show a majority for Modi's BJP-led alliance in election) असा मथळा वापरण्यात आलाय.
"द गारडियन" ही पाश्चात्य माध्यम विश्वातील बडे नाव मानले जाते. जगभरातील घडामोडींवर हा माध्यम समूह प्रभावी भाष्य करतो. "मोदींची आघाडी भारतीय निवडणूक जिंकणार" ( Modi alliance to win easily in Indian election) अशा शब्दांत भारतीय निवडणूक निकालांची शक्यता वर्तविण्यात आली आहे. "रॉयटर्स" या दैनिकाने संभाव्य निकालांचे काहीसे वेगळे वर्णन केले आहे. "मोदींची आघाडी भारताच्या दक्षिणेचे छत तोडण्यास सज्ज" ( Modi's alliance set to break India's southern ceiling ) असे शब्द रॉयटर्सने वापरले आहेत.
"द न्यूयॉर्क टाइम्स" या दैनिकानेही बातमी देताना "मतदान संपले, मोदी 10 वर्षांच्या कार्यकाळावर बहुमताच्या प्रतीक्षेत"(As voting ends in India, Modi awaits a verdict on his 10 years in power") अशी शब्दरचना केली आहे.
उद्या दिनांक 4 जून रोजी भारतातील लोकसभा निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडी विक्रमी बहुमतासह पुन्हा सत्तेत येणार आहे. भाजप आघाडीला मिळणाऱ्या जागा या 350 ते 400 च्या दरम्यान असतील असा अंदाज आहे. विरोधकांनी हा अंदाज हास्यास्पद ठरविला आहे. हा मोदी मिडियाचा अंदाज असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. इंडि आघाडीला 295 जागा मिळतील असा राहुल गांधी यांचा ठाम विश्वास आहे. उबाठा गटाचे संजय राऊत यांनी देखील या अंदाजांबद्दल वेगळे मत व्यक्त केले आहे. आमच्याकडे सत्ता आणि पैसे असते तर आम्ही याच्यापेक्षा चांगले अंदाज व्यक्त केले असते, असे संजय राऊत म्हणाले आहेत. ध्यानस्थ योग्याला किमान 800 जागा मिळायला हव्यात असे, राऊत यांचे म्हणणे आहे. मोदी पुनः पंतप्रधान झाल्यास मुंडन करण्याचा इशारा आम आदमी पक्षाचे नवी दिल्लीच उमेदवार सोमनाथ भारती यांनी दिला आहे.












Click it and Unblock the Notifications