अहमदाबाद प्लेन दुर्घटनेची पुनरावृत्ती; शाळेवरच कोसळले विमान, उडाला हाहाकार अन् मृत्यूचा तांडव,Video
Bangladesh plane crash video : अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या बोईंग विमानाचा भीषण अपघात झाला. या घटनेने संपूर्ण जगाला दाहरून सोडले तर विमानातील प्रवाशांसह घटनास्थळावर असलेल्या सुमारे तीनशे लोकांचे यात प्राण गेले. तर कित्येक लोक जखमी झालेले आहे.
या घटनेला एक ते दीड महिना होत नाही, तोच, याच घटनेची पुनरावृत्ती बांगलादेशात घडली आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथील उत्तरा परिसरातील मिलस्टोन स्कूल अँड कॉलेजमध्ये एक लढाऊ विमान कोसळले.
या अपघातात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी मिळाली आहे. ज्यात 16 विद्यार्थी, 2 शिक्षक आणि पायलट यांचा समावेश आहे.
ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पायलटचे नाव फ्लाइट लेफ्टनंट मोहम्मद तौकीर इस्लाम असे आहे. अपघाताच्या वेळी तो नियमित प्रशिक्षण उड्डाणावर होता. या अपघातात सुमारे पावणे दोनशे लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेने, पुन्हा एकदा, अहमदाबाद दुर्घटनेचे डोळ्यासमोर उभे राहिले आहे.
ज्या ठिकाणी ढाक्यात विमान कोसळले तो भाग शाळेचा परिसर होता, या ठिकाणी एकच गोंधळ आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
काय घडलं नेमकं!
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशची राजधानी ढाका येथे आज (सोमवार, 21 जुलै) दुपारी बांगलादेश हवाई दलाचे एक प्रशिक्षण विमान (F-7) कोसळले. हे विमान माइलस्टोन कॉलेजच्या इमारतीजवळ आदळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यात आकाशात धुराचे लोट आणि घाबरलेले विद्यार्थी घटनास्थळावरुन धावताना दिसत आहेत.

भीषण अपघात अन् बचावकार्याला सुरूवात
पीटीआयच्या वृत्तानुसार, दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. विमान माइलस्टोन कॉलेजजवळ कोसळल्याने परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कॉलेज कॅम्पसमधून धुराचे प्रचंड लोट उठताना दिसत आहेत आणि महाविद्यालयीन विद्यार्थी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावताना दिसले.
विमान अपघाताची माहिती मिळताच बांगलादेश लष्कराचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्य सुरू केले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.
Military training jet crashed into school campus in #dhaka Bangladesh, media reported
— Nikita Sareen (@NikitaS_Live) July 21, 2025
Bangladesh Air Force F-7 BJI aircraft hit Uttara's Milestone School & College campus today citing country's Inter Services Public Relations Directorate..Killed 1 person
On #crash #Bangladesh pic.twitter.com/O9seQrI6XX
उड्डाणानंतर 24 मिनिटांनी दुर्घटना
हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेची पुष्टी केली आहे. त्यानुसार हे F-7 प्रशिक्षण विमान दुपारी १.०६ वाजता उड्डाण घेत होते आणि उड्डाणानंतर अवघ्या २४ मिनिटांनी, म्हणजेच दुपारी १.३० वाजता ते कोसळले. अपघाताचे कारण अद्याप कळू शकलेले नाही आणि या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
#horrifying visuals#bangladesh #dhaka pic.twitter.com/CFLQUEh2O8
— Nikita Sareen (@NikitaS_Live) July 21, 2025
चीन बनावटीचे आहे विमान
- F-7 विमानाबद्दल बोलायचे झाल्यास, हे विमान चिनी कंपनी चेंगडू एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनने बनवले आहे. हे एकल आसनी विमान असून, त्याच्या काही आवृत्त्यांमध्ये दुहेरी आसनी विमानाचा पर्यायही उपलब्ध आहे.
- F-7 चा कमाल वेग मॅक २.०२ म्हणजेच सुमारे २१२० किलोमीटर प्रति तास आहे. विशेष म्हणजे, बांगलादेशमध्ये F-7 विमान यापूर्वीही कोसळले आहे.
- 8 एप्रिल २००८ रोजी टांगेलमध्ये असेच एक F-7 विमान कोसळले होते. त्या अपघातात पायलट मोर्शेद हसन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
- त्यांनी अपघातापूर्वी विमानातून बाहेर उडी मारली होती, परंतु पॅराशूटमध्ये बिघाड झाल्याने ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा लष्करी रुग्णालयात मृत्यू झाला.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता!
ढाका विमान अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, कारण वेगवेगळे अधिकृत स्रोत मृत आणि जखमींच्या संख्येबाबत वेगवेगळे आकडे देत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या मते, अनेक लोकांनी त्यांच्या डोळ्यांसमोर विमान इमारतीशी आदळताना पाहिले. तर शाळेच्या आवारातच हे विमान कोसळल्याने किती लोकांचा मृत्यू झाला, याची योग्य आकडेवारी अजून अधिकृत संस्थांकडून समोर आलेली नाही.












Click it and Unblock the Notifications