3 लग्न, पोर्नस्टारसोबत संबंध आणि डझनभर महिलांचा बलात्काराचा आरोप; कसे आहेत, डोनाल्ड ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प कोण..? तर एक अब्जाधीश उद्योगपती, विलासी जीवनाचा मालक, आणि सर्वात शक्तिशाली देशाचा राष्ट्रपती... डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष झाले, मात्र ते कायम चर्चेत राहिले त्यांच्या वक्तव्यामुळे आणि त्यांच्या वैयक्तीत आयुष्यामुळे. त्यांच्याबाबतचा हश मनी खटलाही चांगलाच गाजला होता.
या खटल्यातील सर्व 34 आरोपांमधून त्यांची बिनशर्त सुटका करण्यात आली होती. परंतु हे प्रकरण ज्या पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सशी संबंधीत होते त्यापूर्वीही ट्रम्प यांची तीन लग्न झाली होती. ट्रम्प यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल व पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्ससोबतच्या वादाबद्दल आपण आज माहिती घेऊयात...

इवाना ही पहिली पत्नी
इवाना ही डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली पत्नी होय. ट्रम्प जेव्हा 31 वर्षांचे होते त्यावेळी म्हणजेच 1977 ला त्यांनी इवानाशी लग्न केले. त्यावेळी ट्रम्प रिअल इस्टेट डेव्हलपर म्हणून त्यांच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत होते. इवानासोबत त्यांना इवांका, डोनाल्ड ज्युनियर आणि एरिक ट्रम्प ही तीन मुलेही आहेत.
इवाना ही त्यावेळी ट्रम्प ऑर्गनायझेशनमध्ये इंटिरियर डिझाइनची उपाध्यक्षा होती. ट्रम्प यांचा हा पहिला संसार 14 वर्षे टिकला. 1991 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. ट्रम्प यांचे मॉडेल मार्ला मॅपल्ससोबतचे प्रेमसंबंध जगजाहीर झाल्यानंतर इवानासोबतचा त्यांचा संसार मोडला. इवानाशी घटस्फोट घेतल्यानंतर ट्रम्पने मार्लाशी लग्न केले.

चार वर्षात मोडले दुसरे लग्न
इवानाशी घटस्फोट घेतल्यानंतर ट्रम्प यांनी 1993 मध्ये मार्लाशी लग्न केले. विशेष म्हणजे मार्लापासून टिफनी नावाची मुलगी झाल्यानंतर ट्रम्प यांनी हे लग्न लावले. मात्र हा संसारही फक्त चार वर्षे टिकला. 1997 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला.
डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली दोन्ही लग्न दोघात तिसरा आल्यावरच मोडल्याचा आरोप, अमेरिकन माध्यमांमध्ये अनेकदा करण्यात आला आहे. इवानाशी घटस्फोटाचेही हेच कारण सांगितले जाते. मेलानियाचा ट्रम्पच्या आयुष्यात प्रवेश झाल्याने त्यांचे दुसरे लग्न मोडल्याचे सांगितले जाते.

कोण होती मेलनिया?
स्लोव्हेनियाची रहिवासी असलेली मेलानिया 1996 मध्ये फॅशन मॉडेल बनण्यासाठी न्यूयॉर्कला आली होती. आयरीन मेरी मॉडेल्स आणि ट्रम्प मॉडेल मॅनेजमेंटच्या मदतीने तिने माँडेलिंग क्षेत्रात जम बसवला. येथेच तिची डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत ओळख झाली.
1998 मध्ये ट्रम्प आणि मेलानिया एका फॅशन शोमध्ये भेटले आणि त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. दोघांनी 2005 मध्ये लग्न केले. या दोघांना 2006 मध्ये बॅरॉन नावाचा मुलगा झाला. बॅरॉनच्या जन्मानंतर अवघ्या चार महिन्यांनी, ट्रम्पने मेलानियाला फसवण्यास सुरुवात केली. जुलै 2006 मध्ये त्यांचे पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्ससोबत अनैतिक संबंध तयार झाले.

डॅनियल्सला एक कोटी दिले?
पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने ट्रम्पवर 2006 मध्ये तिच्यासोबत लैंगिक संबंध केल्याचा आरोप केला. 2016 च्या राष्ट्रपती निवडणुकीत या प्रकरणाची चांगलीच चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी रात्री जेवण्यासाठी तिला त्यांच्या खोलीत बोलावल्याचा आरोप स्टॉर्मीने केला होता. जेव्हा ती तिथे पोहोचली तेव्हा ट्रम्पने तिच्याशी शारिरीक संबंध निर्माण केले.
या बदल्यात तिला टीव्ही शो मिळवून देण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिल्याचे तिचे म्हणणे होते. याच स्टार्मीला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गप्प बसण्यासाठी एक कोटी दिल्याचा आरोपांचीही त्यावेळी चर्चा झाली होती. याबाबत खटलाही चालला. मात्र त्यात ट्रम्प यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ट्रम्पची इमेज नेहमीच प्लेबॉय राहिली आहे. ट्रम्प यांच्यावर जवळजवळ एक डझन महिलांनी लैंगिक छळ किंवा बलात्कारासह गंभीर आरोप केले आहेत. काही आरोप 1980 च्या दशकातील आहेत.













Click it and Unblock the Notifications